Photo of zunka & Thecha by Geeta Koshti at BetterButter
1545
7
0.0(1)
0

zunka & Thecha

Feb-15-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. झुणका साहित्य -
  2. डाळीचे पीठ वाटीभर
  3. लाल तिखट ४ चमचे
  4. तेल १ डावभर
  5. कांदा
  6. कोथींबीर, हिरव्या मिरच्या २-३,लसूण पाकळ्या
  7. मीठ चवीनुसार
  8. ठेचा साहित्य -
  9. १५ हिरव्या मिरच्या,
  10. ६ ते ७ लसणाच्या पाकळ्या
  11. १/२ टिस्पून मिठ
  12. १/२ टिस्पून तेल
  13. आवडत असेल त कच्चे भरडसर शेंगदाने
  14. कोथिंबीर

सूचना

  1. झुणका कृती -
  2. १ वाटी पाण्यात १ वाटीभर डाळीचे पीठ कालवावे.
  3. कांदा, हिरव्या मिरच्या चिरून घ्याव्या. कोथींबीर चिरून घ्यावी.
  4. लोखंडी कढईत १ डावभर तेलाची खंमग फोडणी करा
  5. त्यात हिरव्या मिरच्या, लसूण, कांदा घालून परतावे
  6. कांदा लालसर झाला की लाल तिखट घालून लगेच पाण्यात कालवलेले पीठ व मीठ घालावे
  7.  उलथण्याने लगेच हालवावे ते घट्ट होईल
  8. मंद गॅसवर २ वाफा काढा
  9. कोथींबीर घालून झुणका उतरवावा.
  10. ठेचा कृती -
  11. मिरच्यांची डेखं काढून घ्यावीत,
  12. लसूण सोलून घ्यावा
  13. कढई गरम करण्यास ठेवावी
  14. २-३ चमचे तेल घालावे,
  15. मिरच्या आणि लसूण घालून मंद आचेवर साधारण ५ मिनीटे झाकण ठेवून वाफ काढावी.
  16. वाफ काढली कि झाकण काढून मिरच्या-लसूण परतून कोरडे करून घ्यावे.
  17. गार झाले कि मिठ घालून खलबत्त्यात कुटून घ्यावे , शेंगदाणे घालावे
  18. तेल गरम करून कुटलेला ठेचा थोडावेळ परतून घ्यावा. हा भाकरीबरोबर सुरेख लागतो.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Darshana Mahajan
Feb-17-2018
Darshana Mahajan   Feb-17-2018

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर