मुख्यपृष्ठ / पाककृती / मोघलाई पराठा

Photo of Mughlai Paratha by Souvik Mukherjee at BetterButter
3234
395
4.8(0)
1

मोघलाई पराठा

Feb-28-2016
Souvik Mukherjee
30 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • वेस्ट  बंगाल
  • फ्रायिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. कणिक बनविण्यासाठी :
  2. मैदा - 3 वाट्या
  3. एक चिमुटभर मीठ
  4. 3 मोठे चमचे रिफाइंड तेल
  5. कोमट पाणी (पीठ मळण्यासाठी)
  6. पराठ्यांसाठी:
  7. हलके तळण्यासाठी तेल:
  8. 4 अंडी
  9. बारीक चिरलेले कांदे 1/4 वाटी
  10. 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  11. भरण्यासाठी खिमा बनविण्यासाठी :
  12. 250 ग्रॅम्स मटण खिमा
  13. 1 मोठा कांदा (काप बनविलेला)
  14. 1 हिरवी मिरची
  15. 1 मोठा चमचा आले-लसणाची पेस्ट
  16. आर्धा लहान चमचा जिरेपूड
  17. अर्धा लहान चमचा धणेपूड
  18. 3-4 लसणाच्या पाकळ्या (ठेचलेल्या)
  19. 1/4 लहान चमचा गरम मसाला
  20. 1/8 लहान चमचा हळद
  21. मीठ चवीनुसार
  22. 1/8 वाटी चिरलेली कोथिंबीर
  23. 1/4 लहान चमचा लाल तिखट
  24. 3 मोठे चमचे रिफाईन्ड तेल
  25. सुक्या बटाट्याच्या भाजीसाठी :
  26. 4 मोठे बटाटे
  27. 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  28. 1 लहान चमचा आल्याची पेस्ट
  29. अर्धा लहान चमचा मिरपूड
  30. अर्धा लहान चमचा लाल तिखट
  31. 1 लहान चमचा जिरेपूड
  32. 1/4 लहान चमचा हळद
  33. मीठ चवीनुसार
  34. 2 मोठे चमचे रिफाईन्ड तेल

सूचना

  1. कणिक तयार करण्यासाठी:
  2. मैदा, मीठ आणि तेल एकत्र करा आणि ब्रेडक्रम्ससारखे दिसेपर्यंत हलवत रहा. नंतर कोमट पाणी घाला आणि मऊ कणिक मळा.
  3. नंतर हे कणिक ओल्या कापडाने झाका आणि बाजूला ठेवा.
  4. खिमा भरण्याचे सारण बनविण्यासाठी:
  5. एक कढईत तेल गरम करा आणि त्यात कांदा मऊ होईपर्यंत परता. यात आले-लसणाची पेस्ट घाला आणि कच्चा गंध जाईपर्यंत हलवित रहा.
  6. आता यात चिरलेली हिरवी मिरची आणि वर सांगितल्याप्रमाणे सर्व मसाले घाला आणि हे शिजेपर्यंत तळा.
  7. नंतर यात मटणाचा खिमा घाल आणि तो नरम होईपर्यंत मंद आचेवर शिजवा.
  8. नंतर त्यात कोथिंबीर आणि ठेचलेला लसूण घालून नीट एकजीव करा. 2-3 मिनिटांपर्यंत तळून घ्या.
  9. आता खिमा थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
  10. सुक्या बटाट्याच्या भाजीसाठी:
  11. बटाटे सोलून चौरस कापा.
  12. आता एका कढईत तेल गरम करा आणि बटाटे बदामी होईपर्यंत तळा.
  13. यात आल्याची पेस्ट, हिरवी मिरची, जिरेपूड, लाल तिखट, मिरपूड आणि मीठ घाला आणि चांगले मिक्स करा आणि सर्व मसाले शिजेपर्यंत परता.
  14. आता यात बटाट्यांना पुरेल इतके पाणी घाला आणि झाकण लाऊन बटाटे मऊ होईपर्यंत शिजवा.
  15. सुकी भाजी बनविण्यासाठी यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या.
  16. पराठ्यांसाठी:
  17. 8 एकसारख्या आकाराचे गोळे करा.
  18. लाटण्याच्या मदतीने त्याच्या पोळ्या लाटून घ्या.
  19. एका वाडग्यात अंडे आणि मीठ घालून फेटा.
  20. लाटलेल्या पोळीवर 1 लहान चमचा अंड्याचे मिश्रण लावा.
  21. नंतर 1 मोठा चमचा खिमा पोळीच्या मध्यभागी चौरस आकारात पसरवा.
  22. आता खिम्यावर 2 लहान चमचे अंड्याचे मिश्रण घाला. नंतर त्यावर चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरचीचा शिडकाव करा.
  23. आता पराठ्याला एखाद्या पाकीटासारखे बंद करा, अगोदर उभ्या बाजू बंद करा आणि नंतर आडव्या बाजू बंद करा एखाद्या पार्सलसारखे दिसेल.
  24. एक पॅनमध्ये परतण्यासाठी तेल गरम करा. जेव्हा तेल गरम होईल आच मध्यम करा. यामध्ये पार्सलला तळा, एक बाजूला झाले की दुसऱ्या बाजूला तळा (जवळजवळ 3-4 मिनिटांपर्यंत). नंतर काढून पेपर टॉवेलवर तेल झिरपण्यासाठी ठेवा.
  25. ही प्रक्रिया उरलेल्या कणिकाबरोबर करा.
  26. सुक्या बटाट्याच्या भाजीबरोबर गरम गरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर