मुख्यपृष्ठ / पाककृती / गोड दशमी आणि शेंगदाण्याची चटणी

Photo of God dashami(sweet chapati) with shengdana(peanut) chutney by Ajinkya Shende at BetterButter
422
7
0(0)
0

गोड दशमी आणि शेंगदाण्याची चटणी

Feb-16-2018
Ajinkya Shende
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड दशमी आणि शेंगदाण्याची चटणी कृती बद्दल

पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. *दशमीसाठी-
 2. कणिक ३ वाटी
 3. पाव वाटी तेल
 4. गुळाचं पाणी(पाऊण वाटी गूळ एक वाटी वाटी पाण्यात भीजवुन ठेवायचा)
 5. चिमुथभर मीठ
 6. *चटणीसाठी-
 7. १ वाटी भाजलेले शेंगदाणे
 8. १०-१२ पाकळ्या लसुण
 9. लाल मिर्ची पावडर १ चमचा(आवडीप्रामणे कमी किंवा जास्त)
 10. थोडी कोथिम्बीर
 11. चवीनुसार मीठ

सूचना

 1. प्रथम कणकेमधे तेलाचं मोहन व गुळाचं पाणी टाकून कणिक पोळीसाठी भीजवतो त्याप्रमाणे भीजवुन घ्यावी व १५-२० मिनिट झाकुन ठेवावी.
 2. तोपर्यंत शेंगदाणे,लसुण,कोथिम्बीर,तिखट,मीठ व आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सर मधे ही चटणी बनवून घ्यावी.
 3. दशमी बनवण्यासाठी कणकेचे २ सारख्या आकाराचे गोळे थोडे लाटुन घ्यावे.
 4. नंतर एका पारीवर तेल लावून दूसरी पारी त्याच्यावर ठेवून थोडे जाडसर लाटुन तेल लावून दशमी तव्यावर खमंग शेकुन घ्यावी.
 5. सर्व करताना शेंगदाण्याच्या चटणी वरून थोडं कच्च तेल टाकून त्या चटणी सोबत दशमी सर्व करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर