मुख्यपृष्ठ / पाककृती / झणझणीत पुणेरी मिसळ

Photo of Zanzanit Puneri Misar by Archana Lokhande at BetterButter
728
7
0.0(0)
0

झणझणीत पुणेरी मिसळ

Feb-16-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झणझणीत पुणेरी मिसळ कृती बद्दल

झणझणीत पुणेरी मिसळ - म्हणजे झणझणीत आणि थोडी गोड असते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. एक मध्यम आकाराचा कांदा
  2. एक मध्यम आकाराचा टोमँटो
  3. तेल ३-४ चमचे
  4. लाल तिखट २ चमचे
  5. हळद
  6. गरम मसाला
  7. हिंग
  8. पाणी ३-४ वाटी
  9. मीठ
  10. मटकी १०० ग्रँम मोड आलेली
  11. आल-लसूण पेस्ट
  12. फरसाण
  13. बारीक शेव
  14. कोथिंबिर
  15. लिंबू
  16. पाव
  17. साखर पाव चमचा

सूचना

  1. मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून तेलात लालसर होईपयँत परता.
  2. त्यात मध्यम आकाराचा टोमँटो बारीक चिरून तेल सुटेपयँत परता.
  3. आता त्यात लाल तिखट,हिंग, हळद, गरम मसाला घालून परता.
  4. ३-४ वाट्या गरम पाणी आणि चवीप्रमाणे मीठ,साखर घालुन चांगली उकळी आणा, हा झाला तयार मिसळीचा कट.
  5. १०० ग्रँम मोड आलेली मटकी तेलात थोडी आल-लसून पेस्ट, तिखट मीठ घालून शिजवून घ्या.
  6. आता डीशमध्ये शिजवलेली मटकी, फरसाण, बारीक शेव, चिरलेला कांदा, मिसळचा तयार कट, बारीक चिरलेली कोथींबीर घालून पाव किंवा ब्रेड व लिंबाच्या फोडीबरोबर झणझणीत पुणेरी मिसळ गरम गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर