मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीचे वरण आणि भात

Photo of Varan ( Split Pegion Peas Curry). by Dr.Shubhangi Kumbhar at BetterButter
659
3
0.0(0)
0

फोडणीचे वरण आणि भात

Feb-17-2018
Dr.Shubhangi Kumbhar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीचे वरण आणि भात कृती बद्दल

महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणावारांना, तसेच उपवास सोडताना प्रामुख्य असणारे वरण आणि भात. वरणाचे बरेच प्रकार आहेत, जसे की, साधं वरण, आंबट वरण, गोड वरण, फोडणीचे वरण आणि अजुन बरेच. आज मी इथे फोडणीच्या वरणाची पाककृती देत आहे. बघितले तर तूरीच्या डाळीला अंगभूत चव नसते. पण मोजके चार घटक घालून, तिला जी अप्रतिम चव येते, त्याला तूलना नाहीच. असे हे पारंपारिक, पौष्टिक आणि सर्वांना आवडणारे वरण भात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. तुरडाळ १/२, कप
  2. हिरव्या मिरच्या ८ ते १०
  3. टोमॅटो १, चिरलेले
  4. लसुण ६ पाकळ्या
  5. कडिपत्ता
  6. कोथिंबीर, १/४ कप
  7. जिरे १ लहान चमचा
  8. मोहरी १ लहान चमचा
  9. तेल २ चमचे
  10. हिंग पाव चमचा
  11. हळद १ लहान चमचा
  12. मीठ १ लहान चमचा

सूचना

  1. प्रेशर कुकरमध्ये पाणी घालून त्यामध्ये धुवून घेतलेली तुरडाळ, अर्धा चमचा हळद, चिरलेले टोमॅटो घालून ४ शिट्ट्या काढुन घ्याव्यात.
  2. तुरडाळ शिजेपर्यंत हिरव्या मिरच्या आणि लसुण वाटुन घ्याव्यात.
  3. एका भांड्यात तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, हिंग आणि कडीपत्ता, वाटलेली मिरची आणि लसुण घालुन फोडणी करावी आणि त्यामध्ये हळद,शिजवलेली तुरीची डाळ घालावी.
  4. मीठ, कोथिंबीर आणि पाणी घालून ४ ते ५ मिनिटे मंद आचेवर शिजवावे.
  5. गरम वरण भाताबरोबर साजुक तुप घालुन सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर