मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळ-मेथीचं वरण

Photo of Dal-methi(fenugreek seeds) varan by Ajinkya Shende at BetterButter
2852
7
0.0(0)
0

डाळ-मेथीचं वरण

Feb-17-2018
Ajinkya Shende
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ-मेथीचं वरण कृती बद्दल

तुरीची डाळ व मेथी दाणे हयांचं पौष्टिक वरण.हिवाळ्यात आरोग्यासाठी उत्तम पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धी वाटी तुरीची डाळ
  2. अर्धी वाटी मेथी दाणे(तुरीची डाळ व मेथी दाणे कूकर मधे ३-४ शिटया घेवून शिजवुन घ्यावी)
  3. ८-१० पाकळ्या बारीक कापलेला लसुण
  4. शेंगदाणे
  5. किसलेलं खोबरं पाव वाटी
  6. एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा
  7. तेल
  8. जीरं,मोहोरी,हींग,कढीपत्ता फोडणीसाठी
  9. 1 चमचा लाल मिर्ची पावडर
  10. अर्धा चमचा काळा/गोडा मसाला
  11. पाव चमचा हळद
  12. अर्धा चमचा धणा जीरा पावडर
  13. मीठ
  14. कोथिम्बीर
  15. लिम्बू

सूचना

  1. प्रथम कढई मधे ४-५ चमचे तेल टाकून त्यात कधीपत्ता,जीरं,मोहोरी,हींग,लसुण टाकून थोडं परतवुन त्यात शेंगदाणे व बारीक कापलेला कांदा टाकून कांदा गुलाबी होईपर्यंत परतवुन घ्यावा.
  2. नंतर हयात किसलेलं खोबरं,लाल मिर्ची पावडर,हळद,काळा/गोडा मसाला,धणा जीरा पावडर टाकून थोडं परतवुन घ्यावे.
  3. नंतर हयात कूकर मधे शिजवलेले मेथी दाणे व तुर डाळ टाकून मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
  4. नंतर हयात आवश्यकतेनुसार पाणी व चवीनुसार मीठ व बारीक कापलेली कोथिम्बीर टाकून डाळ,मेथी दाणे व पाणी व्यवस्थित एकजिव होईपर्यंत हे वरण उकळू द्यावे.
  5. वरण व्यवस्थित एकजिव झाल्यानंतर गॅस बंद करुन वरून अर्धा लिम्बु पिळून वरण व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर