Photo of Patwadi rassa by साची सचिन at BetterButter
2983
6
0.0(1)
0

Patwadi rassa

Feb-18-2018
साची सचिन
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी बेसन
  2. १ चमचा हिरवी मिरची आल लसून भरडून
  3. १/२ चमचा हळद
  4. अर्धी वाटी कोथिंबीर
  5. २ चमचे कांदा लसून मसाला
  6. १/२ चमचा गोडा मसाला
  7. १/२ चमचा गरम मसाला
  8. चविनुसार मिठ
  9. राई
  10. जीर
  11. वटनासाठी साहित्य
  12. २ कांदे चिरलेले
  13. अर्धी वाटी सुक खोबर
  14. १/२ चमचा तीळ
  15. १/२ चमचा खसखस
  16. ४-५ लसून पाकळ्या
  17. ३-४ आल्याच्या चक्त्या
  18. कोथिंबीर
  19. तेल
  20. पाणी

सूचना

  1. प्रथम एका कढईत तेल घेऊन त्यात राई जीर मिरची आल लसून ठेचा घालुन चांगल परता.
  2. मग त्यात १ ग्लास पाणी घाला मग त्यात हळद आणि चविनुसार मिठ घाला. आणि एक उकळी येऊ दया
  3. उकळी आली की त्यात कोथिंबीर घाला
  4. आता या पाण्यात हळू हळू बेसन घालुन चांगले मिश्रण एकजीव करा.गुठल्या होउ देऊ नये.
  5. ५-६ मिनिटे बेसन वाफवुन घ्या
  6. आता एका तेल लावलेल्या ताटात हे मिश्रण थापुन घ्या.मिश्रण थापतना त्या वर थोडी कोथिंबीर आणि किसलेला सुक खोबर घालुन थापा.
  7. आता मिश्रण एका बाजूला थंड होण्यासाठी ठेवा
  8. रस्सा: वाटन करण्यासाठी एका कढ़ईत तेल घेऊन कांदा ब्राउन भाजुन घ्यावा
  9. कांदा भाजला की त्यात तीळ खसखस आणि सुक खोबर घालुन चांगला भाजुन घ्या
  10. मग त्यात लसून आल आणि कोथिंबीर घालुन मिक्सर मधून वाटून घ्या
  11. आता एक दुसऱ्या कढईत तेल 3 चमचे तेल घेऊन चांगले तापले की त्यात वाटलेल वाटन घालुन चांगल परतून घ्या
  12. वाटन परतताना त्यात कांदा लसून मसाला गोडा मसाला हळद घालुन चांगले तेल सुटे पर्यंत परता
  13. आता त्यात १ ते २ ग्लास पाणी घाला.रस्सा थोडा पातलच हवा
  14. आता त्यात चविनुसार मिठ घालुन उकळी काढा
  15. आता त्यात गरम मसाला घालुन २ मिनिट उकळू दया.
  16. तयार आहे पाटवडी आणि रस्सा
  17. सर्व्ह करतानाच वडी रस्सामधे घालावि नाहीतर वडी रस्सा शोशून घेईल

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Seema Umrotkar
Feb-21-2018
Seema Umrotkar   Feb-21-2018

खुप छान

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर