Photo of banana flower by साची सचिन at BetterButter
1656
5
0.0(1)
0

banana flower

Feb-18-2018
साची सचिन
40 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. १ केळफुल
  2. १ वाटी काळे वाटाणे उकडलेले किंवा चवळी किंवा चणे
  3. २-३ चमचे तिखट
  4. १ चमचा गरम मसाला
  5. १ मोठा कांदा बारीक़ कापलेला
  6. ५-६ कड़ीपत्ता पाने
  7. ३_४ कोकम
  8. वटनासाठी: २ मोठे कांदे, अर्धी वाटी ओल खोबर,अर्धी वाटी सुक खोबर,कोथिंबीर,आल लसून ४ ते ५ पाकळ्या

सूचना

  1. केळफूल साफ करून बारीक़ चरावे
  2. केळफुलातील बारीक़ दंड आणि पांढरा पापुद्रा काढून टाकावे
  3. एकदम शेवटी फिकट पिवल्या रंगाचे केलफुल शिल्लक राहील ज्याची पाने निघणार नाहीत तेव्हा त्याचा देठ कापून टाकावा
  4. आता सर्व केळफुल बारीक़ चिरून घ्यावे.आणि रात्रभर मिठाच्या पाण्यात भिजत ठेवावे म्हणजे त्याचा चिक निघुन जातो
  5. सकाळी पाण्यावर आलेला जाडसर चिक काढून टाकावा व पाणी ऒतुन टाकावे
  6. वाटनासाठी घेतलेला कांदा ओल खोबर सुक खोबर एक एक करुन तेलावर चांगल भाजुन घ्यावे मग त्यात कोथिंबीर आल लसुन घालुन मिक्सरला बारीक़ वाटून घ्यावे
  7. आता एक कढईत २ चमचे तेल घेऊन चांगले तापले की त्यात कडिपत्ता घालवा
  8. मग बारीक़ चिरलेला कांदा घालुन चांगले परतावे.
  9. कांदा ब्राउन झाला की त्यात वाटन घालुन चांगले तेल सुटे पर्यंत परतावे
  10. मग त्यात तिखट हळद घालुन परतावे
  11. आता त्यात केलफुल आणि काळे वाटाणे घालुन एकजीव करावे
  12. कोकम घालावे
  13. आता त्यात २ वाटी पाणी घालावे आणि भाजी वाफेवर शीजवावि
  14. एक वाफ आली की त्यात गरम मसाला घालावा. आणि पुन्हा भाजी १० मिनिटे मंद आचेवर शिजु द्यावी.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Seema Umrotkar
Feb-21-2018
Seema Umrotkar   Feb-21-2018

nice

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर