मुख्यपृष्ठ / पाककृती / करगडब् / कडबू

Photo of Kargadb / Kadabu by Aarti Nijapkar at BetterButter
706
4
0.0(0)
0

करगडब् / कडबू

Feb-19-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

करगडब् / कडबू कृती बद्दल

करगडब् / कडबू हा एक पारंपारिक पदार्थ थोडक्यात देवासमोर नैवेद्य दाखवलं जातं चला तर करूयात आपण.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • कर्नाटक
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. चण्याची डाळ २५० ग्रॅम
  2. गूळ १५० ग्रॅम
  3. सुंठ १/२ लहान चमचा
  4. तेल १ लहान चमचा
  5. गव्हाचं कणिक १ वाटी
  6. तेल तळण्यासाठी
  7. तूप सोबत खाण्यासाठी

सूचना

  1. चण्याची डाळ धुवून एका टोपात पाणी व किंचित मीठ घालून डाळ शिजवत ठेवा
  2. डाळ पूर्णपणे शिजली की त्यातलं पाणी गाळून काढा
  3. आता शिजलेल्या चण्याच्या डाळीतल पाणी मंद आचेवर सुकवा उलतनीने खाली वर करून घ्या
  4. मग कापलेला किंवा किसून घेतलेला गूळ मिसळा आता गूळ विरगळे पर्यंत मिश्रण एकत्र करत रहा गूळ पाणी सोडत त्यामुळे मिश्रण परतत रहा चांगले एकजीव झाले की आच बंद करून मिश्रण गार करत ठेवा
  5. जर पुरणाच्या साच्यात पुराण वाटत असाल तर मिश्रण गार करू नका मग गरम असतानाच पुरण पाडा
  6. पुरण वाटून झाले की गव्हाचं मळून घेतलेलं कणिक घ्या
  7. छोटे गोळे लाटून त्यात पुरणाचं सारण भरा आणि करंजी सारखे आकार द्या पण करंजी सारखे कापू नयेत येते आपल्याला कळ्या पडायचे आहेत
  8. सर्व तयार करून घ्या व ताटात ठेवा
  9. कढईत तेल चांगला तापवून घ्या मग मंद आचेवर करगडब् तळून घ्या दोन्ही बाजूने तळून घ्या
  10. सर्व ताटात काढून घ्या
  11. तूपा सोबत गरमागरम खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर