मुख्यपृष्ठ / पाककृती / भाजणीचे थालीपीठ

Photo of BHAJNICHE thalipith by Chayya Bari at BetterButter
946
4
0.0(0)
0

भाजणीचे थालीपीठ

Feb-19-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाजणीचे थालीपीठ कृती बद्दल

मिश्र धान्ये भाजून बनविलेले पौष्टीक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भाजणी
  2. तांदूळ १/२किलो
  3. हरबराडाळ पाव किलो
  4. ज्वारी किंवा बाजरी १/२किलो
  5. मुगडाळ वाटीभर
  6. गहू मूठभर
  7. धने जिरे पाव वाटी
  8. तेल
  9. कांदे
  10. आलेलसूण पेस्ट
  11. हळद
  12. तिखट
  13. ओवा १चमचा
  14. तीळ २चमचे
  15. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सर्व धान्ये जिरे धने वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे
  2. गिरणीतून भाजणी दळून आणावी
  3. ह्ये भाजणीचे पीठ ३वाट्या घ्यावे
  4. त्यात ओवा तीळ आले लसूण पेस्ट कापलेले कांदे हळद तिखटमीठ घालून हाताने कुस्करून मिक्स करावे
  5. मग गरजेप्रमाणे पाणी घालून पीठ भिजवावे
  6. भिजवलेल्या पिठाचा गोळा घेऊन मऊ करावा
  7. कापडावर थालीपीठ थापावे
  8. तवा तापवून त्यावर कापड उलटे करून थालीपीठ टाकावे
  9. थालिपीठाला चमच्याने होल पडून त्यात तेल सोडावे बाजूने तेल सोडावे
  10. झाकण घालावे दोन मिनिटाने उलट करून परत तेल सोडावे झाकण घालावे
  11. नंतर दोन्ही बाजूने थालीपीठ खमंग भाजावे
  12. शेंगदाण्याचा चटणीबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर