मुख्यपृष्ठ / पाककृती / पिठलं भाकरी

Photo of Pithala bhakari by Ajinkya Shende at BetterButter
928
10
0.0(0)
0

पिठलं भाकरी

Feb-19-2018
Ajinkya Shende
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिठलं भाकरी कृती बद्दल

अत्यंय लोकप्रिय महाराष्ट्रीयन पारंपारिक

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. *पिठल्यासाठी-
  2. बेसन १ वाटी
  3. ७-८ ठेचलेल्या लसुण पाकळ्या
  4. २-३ हिरव्या मिरच्या बारीक कापून किंवा लसुण सोबत ठेचुन घ्याव्या.
  5. २ बारीक कापलेले कांदे
  6. हळद
  7. मीठ
  8. तेल
  9. हींग
  10. जीरं
  11. मोहोरी
  12. कढीपत्ता
  13. कोथिम्बीर
  14. *भाकरीसाठी-
  15. १ भाकरीसाठी १ वाटी ज्वारी किंवा बाजरीचं पीठ
  16. मीठ

सूचना

  1. प्रथम एका बाऊल मधे १ वाटी बेसन,हळद,धणा जीरा पावडर,मीठ व दिड ते दोन वाटी पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
  2. नंतर पॅन मधे ४-५ चमचे तेल टाकून त्यात हींग,जीरं,मोहोरी व कढीपत्ता हयांची फोडणी करुन घ्यावी व बारीक कापलेला कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतवुन घ्यावा.
  3. नंतर हयात लसुण व मिर्ची टाकून लसुण थोडा लालसर होईपर्यंत परतवुन घ्यावे.
  4. नंतर हयात पाण्यात मिक्स केलेलं बेसन हळू हळू टाकावं व सतत ढवळत रहावं जेनेकरुन गाठी राहणार नाहीत.
  5. नंतर हयात बारीक कापलेली कोथिम्बीर टाकून पिठलं व्यवस्थित शिजवुन घ्यावे.गरज वाटल्यास थोडं पाणी टाकावं.
  6. भाकरी बनवण्यासाठी ज्वारी किंवा बाजरीचं १ वाटी पीठ घेवून त्यात थोडं मीठ टाकून भाकरीचं पीठ व्यवस्थित मळून घ्यावे.(पीठ जेवढं जास्त हाताने रगडणार तेवढी भाकरी जास्त चांगली होणार)
  7. नंतर पोळपाटावर थोडं कोरडं पीठ टाकून भाकरी हाताने थापुन घ्या.
  8. नंतर भाकरी तव्यावर टाकून वरील बाजुला असलेले कोरडे पीठ स्वच्छ फडक्याने बाजुला काढावे किंवा भाकरीला वरून थोडं पाणी लावावं व दोन्ही बाजूने भाकरी खमंग शेकुन घ्यावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर