BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या रव्याचा उपमा

Photo of Wheat upma by Dr.Rajashree Kulkarni at BetterButter
0
5
0(0)
0

गव्हाच्या रव्याचा उपमा

Feb-20-2018
Dr.Rajashree Kulkarni
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या रव्याचा उपमा कृती बद्दल

मराठी संस्कृती म्हणजे अतिशय समृद्ध खाद्य परंपरा!आपल्या आजी ,पणजी यांच्या काळापासून अनेकविध खाद्यपदार्थ बनवले जात होते. हल्ली जग छोटं झालंय त्यामुळे आपण अनेकविध देशांचे पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट केले आहेत. पण या मुळे आपले स्वतःचे असे,ओरिजिनल पदार्थ कुठेतरी लुप्त होतील की काय अशी भीती वाटते. यापैकीच एक पदार्थ म्हणजे " गव्हाच्या रव्याचा उपमा"!पूर्वी आमची आजी गहू थोडे ओलावून त्याचा कोंडा काढून थोडा जाडसर रवा घरीच कांडत असे.ते तर आता कालबाह्य झाले आहे. पण माझ्या कामवाल्या मावशी अजून हा उद्योग करून गिरणीतून का होईना गव्हाचा रवा मला काढून देतात.बाजारात मिळणारा साधा रवा तर बहुसंख्य वेळा मक्याचा असतो म्हणे!त्यातल्या त्यात दलिया नावाने जो मिळतो तो हल्ली वापरायला हरकत नाही. घटक - गव्हाचा रवा दोन वाट्या,भाज्या जितक्या अधिक टाकता येतील तितका पौष्टिक! कांदा, टोमॅटो, मटार,फरसबी,गाजर,फ्लॉवर, सिमला मिरची, ओले हरभरे मिळाल्यास! हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, उडदाची डाळ, मोहरी,हिंग,हळद हे साहित्य फोडणीसाठी! तेलावर फोडणी करून त्यात सगळ्या भाज्या परतून मग जाड रवा चांगला गुलाबी होईपर्यंत परतावा नंतर आधणाचं पाणी घालून मऊ होईपर्यंत शिजवावा.शेवटी दोन चमचे गायीचं तूप टाकून छान वाफ आणावी. कोथिंबीर, खोबरं, लिंबू पिळून सर्व्ह करावे. शास्त्रीय दृष्ट्या देखील अतिशय पौष्टिक सर्व अन्नघटक देणारा असा हा प्रकार आहे. कर्बोदके, प्रथिने, तंतुमय पदार्थ,स्निग्ध पदार्थ असं सगळं देणारी ही सिंगल डिश आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • सिमरिंग
 • सौटेइंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. जाड गव्हाचा रवा दोन वाट्या
 2. सर्व भाज्या - एकत्र मोठी वाटी भरून
 3. तेल
 4. चवीप्रमाणे मीठ,साखर
 5. गायीचे तूप - 2 चमचे

सूचना

 1. सर्व भाज्या धुवून, चिरून घ्या
 2. कढईत तेल तापवून मोहरी, उडीद डाळ,जिरे, हिंग,हळद,कढीपत्ता, हिरव्या मिरच्या हे साहित्य टाकून फोडणी करा
 3. त्यात सर्व भाज्या टाकून वाफवून घ्या
 4. नंतर रवा घालून छान परतून घ्या
 5. आधण आलेलं गरम पाणी साधारण चार वाट्या टाकून मंद गॅसवर शिजवा
 6. शेवटी दोन चमचे गायीचे तूप टाका
 7. सर्व्ह करताना कोथिंबीर ,लिंबू पिळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर