मुख्यपृष्ठ / पाककृती / जगात भारी कोल्हापुरी मसूर आमटी

Photo of JAGAT bhari kolhapuri masur aamti by Chayya Bari at BetterButter
1260
6
0.0(0)
0

जगात भारी कोल्हापुरी मसूर आमटी

Feb-21-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जगात भारी कोल्हापुरी मसूर आमटी कृती बद्दल

नॉनवेजची आठवण करून देणारी आमटी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भिजलेले मसूर १वाटी
  2. खोबरे थोडेसे
  3. आले,लसूण,कोथिंबीर
  4. कांदा १छोटा
  5. लालमिरच्या २,३
  6. हळद १चमचा
  7. तिखट, काळा मसाला प्रत्येकी २चमचे
  8. मीठ चवीपुरते
  9. तेल फोडणीसाठी
  10. हिंग,जिरे,मोहरी,कढीपत्ता फोडणीसाठी
  11. सजावटीला लसूण पाकळ्या व कोथिंबीर

सूचना

  1. रात्री मसूर भिजत घालावे
  2. तयारीत मसूर स्वच्छ धुवून घ्यावे
  3. तसेच आले लसूण कोथिंबीर खोबरे सर्व साहित्य एकत्र करावे
  4. आले,लसूण,कोथिंबीर,खोबरे यांचे वाटणं करावे व तिखट मसाला मीठ हळद काढून घ्यावे
  5. तेल तापवून जिरे,मोहरी,हिंग,कढीपत्ता,लाल मिरची फोडणीत टाकावी लगेच कांदा कापून घालावा
  6. मग तिखट,मीठ,हळद,काळा मसाला घालून हलवावे व वाटणं घालावे
  7. ते छान परतून झाले तेल सुटले कि मसूर घालून हलवावे व उकळते पाणी घालावे
  8. २वाफेत मसूर लगेच शिजतात भाजी तयार
  9. सर्व्ह करताना कोथिंबीर कापून घालावी कांदा, लिंबू जोडीला ठेवावे वर लसूण पाकळ्या तळून घालाव्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर