मुख्यपृष्ठ / पाककृती / दही धपाटे आणि पेंडपाला

Photo of Dahi Dhapate ani Pendpala by Archana Lokhande at BetterButter
2582
6
0.0(0)
0

दही धपाटे आणि पेंडपाला

Feb-21-2018
Archana Lokhande
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही धपाटे आणि पेंडपाला कृती बद्दल

हा एक पारंपरिक पदार्थ आहे. गौरी मातेच्या आगमना वेळी महाराष्ट्रात नैवेद्य साठी बनवला जातो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाटी ज्वारीचे पीठ
  2. १/४ कप अनुक्रमे बेसन, गव्हाचे,तांदळाचे व मक्याचे पीठ
  3. आल-लसूण-कोथिंबिर-हिरवी मिरची पेस्ट
  4. हळद
  5. ओवा
  6. मीठ
  7. तेल
  8. पाणी
  9. २ वाटी हिरवे मुग
  10. कांदापात अर्धी जुडी
  11. हिंग
  12. जीरे
  13. मोहरी

सूचना

  1. मुग थोडी भाजून कुकरला लावून ३ शिट्टी करून घेतली.
  2. कुकर थंड होईपयँत मिरची -कोथिंबीर-आल-लसूण पेस्ट तयार करूनघेतली, कांदापात कापून घेतली.
  3. ज्वारीचे पिठ, बेसन, गव्हाचे, तांदळाचे, मक्याचे पिठ, आल,लसूण,कोथिंबीर, मिरची पेस्ट, हदळ ओवा मीठ चवीनुसार सर्व एकत्र करून छान मळून घेतले.
  4. आता कढईत तेल घालून त्यात जिरे-मोहरी तडतडले की, हिंग, वाटलेली पेस्ट,हळद घालून परतले.
  5. नंतर पात घालून थोडी वाफवून घेतली.
  6. नंतर मुग आणि मीठ घालून मिक्स करून ५ मिनीट झाकण ठेवून वाफवून गँस बंद केला.
  7. आता धपाटे बनवण्यासाठी गँसवर तवा गरम करण्यास ठेवून हातावर धपाटे थापून घ्या. तव्यावर थोडे तेल सोडून दोन्हीबाजूने खरपूस भाजून घेतले.
  8. एका वाटीत दही, धपाटे आणि मुगाचा पेंडपाला सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर