मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी थेपला

Photo of Methi thepla by Geeta Koshti at BetterButter
795
4
0.0(0)
0

मेथी थेपला

Feb-21-2018
Geeta Koshti
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी थेपला कृती बद्दल

लहान मुलांना भाजी मनापासून आवडत नसेल तर कही तरी वेगळा असा पैष्टीक पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ कप बारीक चिरलेली मेथीची भाजी
  2. १/२ कप कणिक
  3. २ टेस्पून दही
  4. १/२ टिस्पून जिरे पुड
  5. १/४ टिस्पून ओवा पुड
  6. १/४ टिस्पून हळद
  7. १/२ टिस्पून पांढरे तिळ ( इच्छेनुसार )
  8. २-३ हिरव्या मिरच्या - बारीक वाटुन,
  9. थोडेसे तेल / तुप वरतून लावण्यास
  10. चवीपुरते मिठ

सूचना

  1. एका भांड्यात निवडून धुन चिरलेली मेथी आणि साधारण १/२ टिस्पून मिठ घालून १0 मिनीटे झाकून ठेवावे.
  2. थोड्यावेळात मेथीला किंचीत पाणी सुटेल
  3. मेथीमध्ये ओवा, जिरेपूड, हळद, तिळ ,हिरव्या मिरच्या घालावे आणि मिक्स करावे कणिक, किंचीत मिठ आणि दही ,पाणी घालून घट्ट मळून घ्यावे
  4. मळलेले पिठ झाकून ठेवावे. १0 मिनीटाने पिठ एकदा परत मळून घ्यावे
  5. गोळे करून घ्यावे
  6. तवा गरम करावा. पोळ्या करतो तसे लाटून घ्यावे
  7. ( जे लावायछचे असेल ते ) तुप/ तेल लावून दोन्ही बाजू निट भाजून घ्याव्यात.
  8. गरम थेपला दहि /चटणी सोबत सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर