1925
4
0.0(0)
0

खरवस

Feb-22-2018
Manisha /(Radhika wagh)
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खरवस कृती बद्दल

हा पूर्वी पासून करत असलेला पारंपरिक पदार्थ आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. १ लिटर पहिल्या दिवसाचा दुधाचा चिक
  2. १ लिटर दुध
  3. अडीचशे ग्राम गूळ /साखर
  4. २-३ चिमटी केशर
  5. १/२ टीस्पून वेलचीपूड
  6. मोठा कुकर
  7. २ कुकरच्या आतील डबे

सूचना

  1. केशर अगदी थोडे कोमट करून पाव वाटी दुधात भिजत घालून ठेवावे.
  2. चिक पहिल्या दिवसाचा असल्यास दाट असतो त्यामुळे त्यात तेवढेच दुध घालावे लागते। दुसऱ्या दिवसाचा चिक असल्यास निम्मे दुध लागते. आणि तिसऱ्या दिवसाला निम्म्याहून थोडे कमी लागते. चिक विकत घेताना तसे विचारून घ्यावे.
  3. चिक आणि दुध एकत्र करून त्यात गूळ घालावी. गूळ विरघळेस्तोवर ढवळावे. चव पाहून लागल्यास अजून गूळ घालावा
  4. केशर आणि वेलची पूड घालून मिक्स करावे.
  5. तयार मिश्रण कुकरमध्ये शिजवून घ्यावे.कुकरचे २ मोठे डबे घ्यावे. डब्यात तयार मिश्रण सारखे विभागून घालावे. कुकरच्या तळाशी दीड इंचभर पाणी घालावे. एक डबा अलगदपणे पकडीच्या मदतीने आत ठेवावा. त्यावर ताटली ठेवावी. त्याच्या डोक्यावर अजून एक डबा ठेवावा. वर अजून एक ताटली ठेवावी. झाकण लावून २ शिट्ट्या कराव्यात. आच बारीक करून मिनिटभराने बंद करावी.
  6. ५-८ मिनिटांनी कुकरचे प्रेशर गेल्यावर झाकण काढून दोन्ही डबे बाहेर काढावेत. गार होईस्तोवर हवेवर उघडेच ठेवावे.
  7. कोमटसर झाले की खाल्ले तरी चालते. पण फ्रीजमध्ये गार करून खाल्ल्यास अजून स्वादिष्ट लागतात.
  8. खरवस फ्रीजमध्ये ८ दिवस सहज टिकतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर