Photo of Gopalkala by Archana Lokhande at BetterButter
743
4
0.0(0)
0

गोपाळकाला

Feb-22-2018
Archana Lokhande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोपाळकाला कृती बद्दल

हा पारंपरिक पदार्थ दहीहंडी/गोपाळकालाला बनवला जातो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी जाड पोहे
  2. १ वाटी मुरमुरे आणि लाह्या (थोडे भाजलेले)
  3. काकडी, डाळिंब,डाळे,केळी, सफरचंद आवडीप्रमाणे
  4. मीठ,साखर चवीनुसार
  5. थोडी कोथिंबिर
  6. २ वाटी घट्ट दही
  7. मोहरी
  8. जिरे
  9. हिंग
  10. हिरव्या मिरच्या २-३
  11. साजूक तूप २ चमचे
  12. थोड आल किसू

सूचना

  1. काकडी, सफरचंद आणि केळी बारीक चिरून घेतली.
  2. पोहे चाळणीत घेऊन वरून पाणी ओता.(पोहे जास्त भिजवायचे नाहीत फक्त ओले करायचे).
  3. एका भांड्यात पोहे, भाजलेले मुरमुरे आणि लाह्या, बारीक कापलेले डाळिंब, काकडी, सफरचंद, केळ,डाळे, साखर, मीठ,कोथिंबिर आणि दही घालून सर्व मिक्स करून घ्या.
  4. आता फोडणीसाठी कढईत तुप टाका.
  5. तुप तापले की, जिरे, हिंग, मिरची, किसलेले आल घालून १ मिनीट परतून घ्या.
  6. तयार फोडणी पोह्याच्या मिश्रणावर ओता आणि छान मिक्स करा.
  7. आणि आता तयार मस्त फोडणी दिलेल्या गोपाळकालावर ताव मारून फस्त करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर