मुख्यपृष्ठ / पाककृती / पूरण पोळी , आमटी आणि वांग्याची भाजी

Photo of Puran poli , Aamti. Vangyachi bhaji by Aarti Nijapkar at BetterButter
4173
3
0.0(0)
0

पूरण पोळी , आमटी आणि वांग्याची भाजी

Feb-22-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पूरण पोळी , आमटी आणि वांग्याची भाजी कृती बद्दल

पूरण पोळी , आमटी आणि वांग्याची भाजी हा आपला महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थ... खरं तर हे आपल्या महाराष्ट्राची शान आहे, अनेक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते खापर पूरण पोळी , तेल पूरण पोळी , बरेच काही जण किंचित कणिक मळताना हलदीचा वापर करतात पण चव मात्र चिभेवर नुसती रेंगाळत असते जगाच्या पाठीवर कोठेही जा पण आपल्या पूरण पोळी , आमटी वांग्याची भाजी सारखे पदार्थ नाही प्रत्येकाला आवडेल असा पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. पूरण पोळी
  2. चण्याची डाळ २५० ग्रॅम
  3. गूळ १५० ग्रॅम
  4. वेलची पावडर किंवा सुंठ १ लहान चमचा
  5. तेल किंवा तूप
  6. गव्हाचं कणिक १ वाटी
  7. आमटी
  8. कांदा १ मध्यम
  9. सुख खोबरं १/४ कप
  10. आलं १/२ इंच
  11. लसूण ३ ते ४ पाकळ्या
  12. कोथिंबीर १ मोठा चमचा
  13. कांदा लसूण मसाला गावठी १ मोठा चमचा
  14. लाल बेडगी मिरची पावडर १/२ लहान चमचा
  15. हळद १/४ लहान चमचा
  16. मीठ स्वादानुसार
  17. चण्याच्या डाळीचं पाणी २ ते ३ वाट्या किंवा आवश्यकतेनुसार
  18. वांग्याची भाजी
  19. वांगी उभे लांब चिरलेले ५ ते ६
  20. जिरे १ लहान चमचा
  21. मोहरी १ लहान चमचा
  22. कडीपत्ता ५ ते ६ पाने
  23. हिंग १/४ लहान चमचा
  24. कांदा उभा चिरलेला १
  25. टोमॅटो १ उभा चिरलेला
  26. हळद १/४ लहान चमचा
  27. मीठ स्वादानुसार
  28. लाल तिखट १/२ लहान मसाला
  29. काळा मसाला १ मोठा चमचा
  30. कोथिंबीर चिरलेली १ मोठा चमचा

सूचना

  1. चण्याची डाळ धुवून एक टोपात पाणी , तेल व किंचित मीठ घालून डाळ शिजवत ठेवा
  2. डाळ पूर्णपणे शिजली की त्यातल पाणी काढून ठेवा आमटीला वापरण्यासाठी
  3. आता गॅसवर चण्याच्या डाळीतल पाणी सुकवून घ्या उलतनीने खाली वर करा
  4. आता कापलेला की या किसून घेतलेलं गूळ मिसळा मग गूळ विरघळेपर्यंत मिश्रण एकत्र करत रहा गूळ पाणी सोडते त्यामुळे उलतनीने सतत खाली वर करत रहा चण्याची डाळ आणि गूळ चांगले शिजले की गॅस बंद करा
  5. पुरण पाट्यावर वाटून घ्या किंवा पुरणाच्या साच्यात पुरण पाडून घ्या
  6. वाटलेलं पुरण एक भांड्यात भरून ठेवा
  7. मळलेलं कणिक घ्या कनकाचे गोळे करून आत पुरण भरून घ्या व कणकेचा गोळा करून पोळी लाटा हलक्या हाताने लाटावे जेणेकरून पुरण सर्विकडे फिरेल
  8. गॅस वर तवा तापवून तयार पोळ्या चांगल्या भाजून घ्या
  9. अश्या पद्धतीने पोळ्या करून घ्या
  10. आमटी
  11. कांदा , खोबरं ,आलं , लसूण सर्व तेलात भाजून घ्या व त्याच वाटण करा
  12. एक टोपात तेल तापवून त्यात कडीपत्ता घाला व वाटलेलं वाटण घालून चांगले तेलात भाजून घ्या
  13. आता कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद ,मीठ घाला व मसाला एकजीव करून घ्या
  14. मग आपण काढून ठेवलेले डाळीचे पाणी घाला व चांगल्या उकळ्या येऊ द्या
  15. तयार आमटीवर चिरलेली कोथिंबीर घाला
  16. वांग्याची भाजी
  17. एका कढईत तेल तापवून घ्या मग त्यात जिरे, मोहरी,कडीपत्ता ,हिंग घाला मग चिरलेला कंदा , टोमॅटो घालून परतवून घ्या
  18. आता लाल तिखट , काळा मसाला ,हळद व मीठ चवीनुसार घालून मिश्रण एकजीव करून घ्या
  19. चिरलेले वांगी घालून मसाल्यात एकत्र करून चिरलेली कोथिंबीर घालून भाजी वाफवून घ्या ४ ते ५ मिनिटे
  20. वांग्याची भाजी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर