मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर मसाला

421
2
0.0(0)
0

पनीर मसाला

Feb-22-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर मसाला कृती बद्दल

मुळचा पंजाबी मात्र सर्वत्र प्रसिध्द असलेला पनीर बटर मसाला हा पनीर, बटर, कसुरी मेथी वगैरे पदार्थ घालून घरच्या घरी बनवला जाऊ शकतो आणि अगदी हॉटेल मध्ये मिळणार्‍या पनीर बटर मसाल्या सारखीच चव आपण घरी आणू शकता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • तामिळ नाडू
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. २०० ग्राम पनीर
  2. २ टेस्पून बटर
  3. २ टीस्पून आलेलसूण पेस्ट
  4. १ मध्यम कांदा
  5. २ लहान टोमॅटो 
  6. २  टीस्पून धणेपूड
  7. १  टीस्पून गरम मसाला पावडर
  8. १ ते २ टीस्पून लाल तिखट
  9. १ टीस्पून टोमॅटो सॉस
  10. १ कप दूध
  11. तेल
  12. चिरलेली कोथिंबीर
  13. मीठ

सूचना

  1. सर्वप्रथम पनीरचे तुकडे करून ते नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये थोडे तेल घालून शालो फ्राय करून घ्यावे.
  2. कांदा उभा पातळ चिरून घ्यावा आणि नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये ३-४ चमचे तेलावर खरपूस तळून घ्यावा. पेपर टॉवेलवर काढून अधिकचे तेल काढून टाकावे.
  3. २ टोमॅटो उकडून घ्यावेत. साले काढून त्याची दाटसर प्युरी करावी.
  4. धणेपूड, गरम मसाला, लाल तिखट, टोमॅटो सॉस,  टोमॅटो प्युरी, आणि दूध एकत्र ढवळून ग्रेव्हीसाठी मिश्रण तयार करावे. मिश्रण एकदम पातळ किंवा एकदम घट्ट नसावे.
  5. कढईत बटर वितळवावे. आले लसूण पेस्ट घालून परतावी. तळलेला कांदा घालावा. ग्रेव्हीसाठी तयार केलेले मिश्रण घालावे. मध्यम आचेवर ५ मिनीट झाकण ठेवून शिजू द्यावे. मीठ घालावे. फ्राय केलेले पनीरचे तुकडे घालावे. १ उकळी काढावी. कोथिंबीर पेरून गरम गरम सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर