मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीचे मोदक

Photo of OOKDICHE modak by Chayya Bari at BetterButter
337
6
0(0)
0

उकडीचे मोदक

Feb-22-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीचे मोदक कृती बद्दल

बाप्पाचा प्रसाद

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ओल्या नारळाचा चव २वाट्या
  2. गूळ १वाटी
  3. भाजलेली खसखस ४चमचे
  4. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  5. तांदुळाचे पीठ ३वाट्या
  6. मीठ चवीपुरते
  7. तेल २चमचे
  8. साजूक तूप १/४वाटी

सूचना

  1. तयारीत नारळ खवून गूळ व साजूक तूप मिक्स करून गॅसवर ठेवावे
  2. मिश्रण पातळ होते मग आळू लागते कांदा सुटू लागलेकी वेलदोडे जायफळ पूड खसखस घालून खाली उतरवावे
  3. पातेल्यात ३ वाट्या पाणी ठेवून मीठ व १चमचा तेल घालावे
  4. पाणी उकलेपर्यंत पीठ गाळून घ्यावे
  5. पाणी उकळले कि पीठ घालून मिक्स करावे
  6. २मिनिटाने झाकण ठेवून जरा वाफ घेऊन गॅस बंद करावा
  7. मग ह्ये पीठ परातीत काढून वाटीने रगडावे गार होते
  8. त्याची गोळी करून खोल वाटीसारखा आकार करून सारण भरावे
  9. पाकळ्या करून मोदक बंद करावे
  10. असे मोदक भरून झाले की मोदकपात्रात ठेवून १०,१२,मिनिटं वाफवावे
  11. मोदकपात्र नसेल तर कढईत स्टॅन्ड ठेवून पाणी ठेवावे चाळणीला तूप लावून त्यावर ठेवून वाफवावे
  12. तयार मोदकावर साजूक तूप घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर