डाळ | Dal Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  22nd Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Dal by Aarti Nijapkar at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

0 votes
डाळ recipe

डाळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal Recipe in Marathi )

 • तुरीची डाळ १/२ वाटी
 • मुगाची डाळ १/४ वाटी
 • टोमॅटो १ मध्यम
 • हळद १ लहान चमचा
 • मीठ चवीनुसार
 • शेवग्याच्या शेंगा तुकडे ६ ते ८
 • वाटणासाठी
 • ओला खोबरं १/४ वाटी
 • हिरवी मिरची २ ते ३
 • जिरे १ लहान चमचा
 • लसूण २ ते ३ पाकळ्या
 • कोथिंबीर १ मोठा चमचा
 • फोडणीसाठी
 • तेल १ मोठा चमचा
 • मोहरी १ लहान चमचा
 • कडीपत्ता ५ ते ६
 • हिंग १/२ लहान चमचा

डाळ | How to make Dal Recipe in Marathi

 1. तुरीची डाळ व मुगाची डाळ एकत्र करून धुवुन घ्या मग ४ ते ५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा
 2. मग कुकर मध्ये डाळ घाला पुरेसे पाणी घाला टोमॅटो चिरून घाला न मीठ घालून ढवळा आणि शिजवून घ्या ३ ते ४ शिट्या होऊ द्या
 3. शेवग्याच्या शेंगा सोलून घ्या व पाण्यात थोडे मीठ घालून उकळवून घ्या
 4. आता कोथिंबीर , जिरे ,हिरवी मिरची, लसूण व ओल खोबरं मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या लागल्यास थोडं पाणी घालून वाटा
 5. टोपात तेल तापवून त्यात कडीपत्ता, मोहरी घाला व चांगली तडतडू द्या मग हिंग घाला व वाटलेला मसाला घालून चांगला परतवून घ्या मसाल्याचा कच्चा पणा जाईपर्यंत मसाला भाजून घ्या
 6. शिजवलेली डाळ रवीने गोठून घ्या आणि मसाल्यात डाळ ओता व शेवग्याच्या शेंगा घालून एकजीव करून घ्या हवं असल्यास थोडे मीठ घालावे व चांगली उकळी येऊ द्या ५ ते ७ मिनिटे
 7. तयार डाळीवर चिरलेली कोथिंबीर घाला
 8. भातासोबत गरमागरम आस्वाद घ्या

My Tip:

शेवग्याच्या शेंगा कुकर मध्ये शिजवू शकता पण कोवळे शेंगा जास्त शिजले जातात म्हणून वेगळे भांड्यात शिजवावे

Reviews for Dal Recipe in Marathi (0)