मुख्यपृष्ठ / पाककृती / पिठलं आणि बाजरीची भाकरी

Photo of Pithla ani bajarichi bhakri by Aarti Nijapkar at BetterButter
0
7
0(0)
0

पिठलं आणि बाजरीची भाकरी

Feb-22-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिठलं आणि बाजरीची भाकरी कृती बद्दल

वाहह पिठलं आणि भाकरी नावच पुरेसं आहे जगात कुठेही जा अशी जोडी कुठेही सापडणार नाही मुळात ह्याची चव म्हणजे क्या बात चला तर पटकन साहित्य व कृती बघून घेऊ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पिठलं साठी
  2. भिजवणीसाठी
  3. बेसन १ वाटी
  4. हळद १ मध्यम चमचा
  5. पाणी २ वाटी
  6. फोडणीसाठी
  7. तेल १ मोठा चमचा
  8. मोहरी १/४ लहान चमचा
  9. हिंग १/२ लहान चमचा
  10. कांदा बारीक चिरलेला १ मध्यम
  11. हिरवी मिरची ३ ते ४
  12. लसूण १ ते २ पाकळ्या
  13. कोथिंबीर १ मोठा चमचा
  14. मीठ स्वादानुसार
  15. बाजरीच्या भाकऱ्या
  16. बाजरीचं पीठ २ वाट्या
  17. पाणी आवश्यकतेनुसार
  18. मीठ किंचित

सूचना

  1. एका भांड्यात बेसन , हळद व मीठ घ्या एकत्र करा मग पाणी घालून मिश्रण व्यवस्थित मिसळा गुठळ्या राहू देऊ नका ५ ते ६ मिनिटे भिजत ठेवा
  2. एक कढईत तेल तापवा त्यात मोहरी घाला तडतडल्यावर हिंग घाला मग लसूण घालून परतवून घ्या ,चिरलेला कांदा हिरवी मिरची घालून परतवून घ्या
  3. भिजवलेलं बेसन कढईत घाला व सतत हलवत रहा जेणेकरून कढईला चिटकणार नाही मंद आचेवर शिजू द्या उकळी येवू द्या
  4. बेसन चा कच्चा पणा जाईपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्या
  5. तयार झालेल्या पिठलवर चिरलेली कोथिंबीर घाला
  6. गरमागरम पिठलं तयार आहे
  7. बाजरीची भाकरी
  8. बाजरीचं पीठ घ्या त्यात मीठ घाला व थोडंस कोमट पाण्यात पीठ मळून घ्या
  9. मळलेल्या पीठाचा गोळा करून भाकरी थापून घ्या
  10. तवा तापल्यावर भाकरी घाला तव्यावर व भाकरीच्या वरच्या बाजूस पाणी लावावं
  11. दोन्ही बाजूस चांगले भाजून घ्यावे
  12. भाकरी चांगली फुगवावी नाहीतर भाकरी मऊसर लागत नाही
  13. अश्या गरमागरम भाकऱ्या थापून भाजून घ्यावे पिठलं सोबत बाजरीची भाकरी खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर