मुख्यपृष्ठ / पाककृती / वांग्याचे भरीत

Photo of Vangyache Bharit by Neeta Mohite at BetterButter
1333
3
0.0(0)
0

वांग्याचे भरीत

Feb-23-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांग्याचे भरीत कृती बद्दल

वांग्याचे भरीत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ मोठे वांगे (साधारण १ पौंड)
  2. २ मध्यम कांदे, बारीक चिरून
  3. १ मोठा टोमॅटो, बारीक चिरून
  4. फोडणीसाठी: -
  5. २ टेस्पून तेल,
  6.  २ चिमटी मोहोरी
  7. १/८ टीस्पून हिंग
  8. १/४ टीस्पून हळद
  9. १/४ टीस्पून लाल तिखट किंवा २ हिरव्या मिरच्या,
  10. ३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
  11. चवीपुरते मीठ
  12. चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी

सूचना

  1. वांगे भाजून घ्यावे.वांगे गार होवू द्यावे. वांगे सोलून आतील गर बाजूला काढावा आणि सुरीने रफली चिरावे.
  2. कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. त्यात चिरलेली लसूण घालून १०-१५ सेकंद परतावे.
  3. कांदा घालून पारदर्शक होईस्तोवर परतावे. कांदा छान परतला गेला कि टोमॅटो घालून एकदम मऊ होईस्तोवर परतावे.
  4. मीठ आणि सोललेले वांगे घालून व्यवस्थित मिक्स करावे. तळापासून परतावे म्हणजे तळाला वांगे चिकटून जाळणार नाही. कडेने तेल सुटेस्तोवर परत राहावे (साधारण ५ ते ८ मिनिटे) गरम भरीत भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर