मुख्यपृष्ठ / पाककृती / रोझ फालूदा

Photo of Rose falooda by Neeta Mohite at BetterButter
778
4
0.0(0)
0

रोझ फालूदा

Feb-23-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रोझ फालूदा कृती बद्दल

गरमीमध्ये थंडावा आणण्यासाठी आणि मुलांचा आवडता पदार्थ फालूदा (Falooda) घरच्या घरी बनवू शकता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ८ स्कूप्स वेनिला आईसक्रिम
  2. १/२ कप रूह अफ्जा रोझ सिरप
  3. २ टेस्पून सब्जा बी
  4. २ ते ३ कप थंड दूध
  5. २ टेस्पून ड्राय फ्रुट्स, छोटे तुकडे
  6. सजावटीसाठी चेरी

सूचना

  1. फालूदा बनवायच्या किमान ५ तास आधी जेली बनवून फ्रिजमध्ये सेट करण्यास ठेवावी. जेली बनवण्यासाठी जेली पावडर आणून पाकीटावरील कृती वाचून जेली बनवावी
  2. सब्जा बी फालूदा बनवण्याच्या किमान २ ते ४ तास आधीच १/२ कप पाण्यात भिजवून ठेवाव्यात.
  3.  १ लिटर पाणी उकळवावे त्यात फालूदाच्या शेवया घालून ४ ते ५ मिनीटे शिजवाव्यात. गरम पाणी काढून टाकावे व थंड पाणी घालून दुसर्‍या भांड्यात थंड पाण्यासकट ठेवून द्यावे.
  4. दुध आणि रोझ सिरप मिक्स करून घ्यावे. गोडपणा जर कमी वाटत असेल तर अजून थोडे रोझ सिरप घालावे. ढवळून तयार ठेवावे.
  5. फालूदा बनवायच्या वेळेस ४ ग्लास घ्यावे . त्यात भिजवलेले सब्जा बी, जेली, शिजवलेल्या शेवया, आईसक्रिमचा १ स्कूप, दुध आणि परत त्यावर १ स्कूप वेनिला आईसक्रिम घालावे. ड्रायफ्रुट्स आणि चेरीने सजवावे. लगेच सर्व्ह करावे. सर्व्ह करताना ग्लासमध्ये १ स्ट्रॉ आणि चमचा घालून द्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर