मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रूट कस्टर्ड

Photo of Fruit Custard-Fruit Salad with Custard by Neeta Mohite at BetterButter
1350
5
0.0(0)
0

फ्रूट कस्टर्ड

Feb-23-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रूट कस्टर्ड कृती बद्दल

झटपट आणि सहज तयार होणारे फ्रूट कस्टर्ड, खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक डेजर्ट आहे. लंच किंवा डिनर नंतर सर्व्ह होणारे कस्टर्ड,सगळ्यांना आवडत. फ्रूट कस्टर्ड तुम्ही मुलांच्या आवडीची फळ घालुन बनवा, मुल लगेच खातील.ह्या व्यतिरिक्त ,जेव्हा केव्हा उरलेली फळ असतील व वेगळी चव हवी असेल तर फटाफट फटाफट फ्रूट कस्टर्ड बनवा व थंड करुन सगळ्यांना खिलवा.चला आपण मिळवून बनवुया एक परफेक्ट डेजर्ट फ्रूट कस्टर्ड.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. आंबा आणि सफरचंद सोलून छोटे तुकडे केलेले
  2. डाळींब
  3. द्राक्ष
  4. क्रीम व्हीप केलेली
  5. ¾ कप दूध
  6. कस्टर्ड पाउडर 
  7. साखर आवडीप्रमाणे

सूचना

  1. एका छोट्या भांड्यात ¾ कप दूध घ्या व त्यात कस्टर्ड पाउडर घाला.
  2. एका भांड्यात उरलेल दूध घ्या व ते उकळायला गॅस वर ठेवा.
  3. कस्टर्ड पाउडर चमच्यानी ढवळा व गुठळ्या संपेपर्यंत ढवळा.नरम बॅटर बनवा
  4. जशी दुधाला हलकी उकळ येईल ,तस त्यात थोडी थोडी कस्टर्ड पाउडर घाला
  5. हे सतत ढवळत रहा म्हणजे गुठळ्या होऊ नये.
  6. ह्यात साखर घाला व घोल घट्ट होईपर्यंत ढवळा.हे घट्ट व्हायला ७-८ मिनीट लागतील.
  7. गॅस बंद करा व मोठ्या भांड्यात कस्टर्ड घाला.
  8. कस्टर्ड थंड झाल्यावर ,ह्यात व्हिप क्रीम घाला.कस्टर्ड-क्रीम नीट फेटत मिक्स करा.
  9. मग , कस्टर्ड मध्ये द्राक्ष,सफरचंद,आंबा व डाळींब घाला.सहळ्या गोष्टी नीट मिक्स करा.हे २ तास फ्रिज मध्ये ठेवा
  10. तोंडाला पाणी सुटणारे फ्रूट कस्टर्ड एका सर्विंग भांड्यात काढा.
  11. चवीष्ट व पौष्टिक फ्रूट कस्टर्ड थोड डाळींब घालुन सजवा व लंच किंवा डिनर नंतर किंवा हव तेव्हा खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर