Photo of Dahi vada by Neeta Mohite at BetterButter
853
5
0.0(0)
0

दही वडा

Feb-23-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही वडा कृती बद्दल

गरमागरम आणि कुरकुरीत उडदाच्या डाळीचा वडा गोड दह्यासोबत खातात म्हणुन याला दही वडा म्हणतात, दही वडा हा चाट म्हणुन मधल्या वेळेतही खाल्ला जाऊ शकतो आणि जेवणासोबतही खाल्ला जाऊ शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. २०० ग्रा. १ कप धुतलेली उडीद डाळ
  2. ३ कप पाणी
  3. १ छोटा चमच जीरे
  4. ५ ग्रा. कापलेले आले
  5. एक छोटा चमचा मीठ
  6. २५० ग्रा. तेल
  7. दही मिश्रणासाठी साहित्य-
  8. ४०० ग्रा. दही
  9. १ छोटा चमचा साखर
  10. ३/४ चमचे जीरे भाजलेले आणि बारीक केलेले
  11. १/२ छोटा चमचे काळे मीठ
  12. २ ग्रा. सफेद काळी मिरची पावडर
  13. सजविण्यासाठी साहित्य-
  14. ५ ग्रा. आले
  15. ५ ग्रा. हिरवी मिरची
  16. ५ ग्रा. कोथिंबीर कापलेली
  17. एक चुटकी लाल मिरची पावडर
  18. १ चुटकी भाजून कुटलेले जीरे
  19. ४ काडी पुदीना पाने
  20. ४० ग्रा. चिंचेची चटणी

सूचना

  1. धुतलेल्या उडदाच्या डाळीस स्वच्छ करून २ तास पाण्यात भिजवावी व काढून वाटावी. आवश्यकता असेल तर थोडे पाणी टाकावे.
  2. एका वाटीत ठेऊन मीठ, जीरे, आले, हिरवी मिरची टाकुन चांगल्या तर्‍हेने मिळवावे. एकसारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे कढईत तेल गरम करावे.
  3. थोडे थोडे करून गोळे ओल्या हाताने टाकावे लालसर भुरे होईपर्यंत शिजवावे (तळण्याअगोदर गोळ्याच्या मध्ये अंगठ्याने दाबून छिद्रा सारखे बनवावे) व काढुन द्यावे तयार वड्यांना पाण्यात नरम होई पर्यंत भिजवावे फेटलेल्या दह्यात साखर, मीठ, जीरे पावडर, काळे मीठ आणि सफेद काळी मिरी टाकावी व चांगल्या तर्‍हेने मिळवावे
  4. वड्यांना पाण्यातून काढुन हळुच निथळून अतिरिक्त पाणि काढुन दह्यात मिळवावे.१०-१५ मिनीट एका बाजुस ठेवावे. थंड करुन आले, हिरवी मिरची, कोथंबीर लाल मिरची पावडर, जीरे पावडर, पुदिना पाने आणि चिंचेची चटणी सजवून वाढावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर