मुख्यपृष्ठ / पाककृती / वांगी भात

Photo of VANGI bhat by Chayya Bari at BetterButter
1
2
0(0)
0

वांगी भात

Feb-23-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांगी भात कृती बद्दल

चविष्ट पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ १वाटी
  2. वांगी २
  3. गरम मसाला १/२चमचा
  4. तिखट २चमचे
  5. हळद १चमचा
  6. मीठ चवीला
  7. जिरे,मोहरी,हिंग कढीपत्ता फोडणीसाठी
  8. आले लसूण पेस्ट १चमचा
  9. कांदा फोडणीला शेंगदाणे ऐच्छिक
  10. गूळ सुपारी एव्हढा
  11. तेल फोडणीसाठी
  12. खोबरे किस थोडासा

सूचना

  1. तयारीत वांगी उभी कापून धुवून घ्यावी
  2. तांदूळ धुवून ठेवावे व पाणी उकळून घ्यावे
  3. आता तेल तापवून जिरे,मोहरी,हिंग,कढीपत्ता घालून फोडणी करावी
  4. शेंगदाणे परतून घ्यावे
  5. कांदा परतावा व आले लसूण पेस्ट घालावी
  6. मग तिखट मीठ हळद घालून मिक्स करावे त्यात वांग्याच्या फोडी व तांदूळ घालून छान परतावे
  7. मग उकळलेले पाणी घालावे
  8. मग मीठ गुळाचा खडा व गरम मसाला घालावा
  9. ५मिनिटाने पाणी कमी झाले की छान हलवून झाकण ठेवावे व गॅस मंद करून भात शिजू द्यावा
  10. अधूनमधून हलवावे
  11. भात शिजला कि गॅस बंद करावा
  12. लोणच्याबरोबर सर्व्ह करावा खोबरे किस घालावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर