मुख्यपृष्ठ / पाककृती / माणिकपैंजन

Photo of MANIKPAIJAN by Chayya Bari at BetterButter
314
5
0.0(0)
0

माणिकपैंजन

Feb-24-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

माणिकपैंजन कृती बद्दल

विदर्भातील पारंपरिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कणिक २वाट्या
  2. तूरीची डाळ शिजवून १/२वाटी
  3. जिरे मोहरी हिंग कढीपत्ता फोडणीसाठी
  4. कांदा १/२
  5. ओवा १/२चमचा
  6. हळद १चमचा
  7. तेल
  8. मीठ चवीला
  9. लसूण कापून,लाल मिरचीचे तुकडे
  10. मेथीची भाजी फोडणीला
  11. कोथिंबीर थोडी

सूचना

  1. तयारीत तुरीची डाळ शिजवून घ्यावी व लसूण कांदा कोथिंबीर कापून फोडणीची तयारी करावी
  2. पिठाचे गोल म्हणजे पैंजण बनवावे व लाटून चौकोनी कापण्या म्हणजे माणिक बनवावे
  3. मग तेल तापवून जिरे मोहरी हिंग कढीपत्ता कापलेला लसूण व शेवटी मेथीची भाजी घालून फोडणी करावी कांदा परतावा
  4. हळद मीठ लाल मिरचीचे तुकडे घालावे मग शिजलेली तूरडाळ घालावी
  5. मग पाण्या घालावे मिश्रण उकळू लागले की त्यात माणिक पैंजण सोडावे आधी पैंजण व ५मिनिटे शिजले कि माणिक सोडावे
  6. आणखी ७मिनिटे शिजू द्यावे
  7. मग कोथिंबीर व तेल घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर