BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Gola bhat Nagpuracha

Photo of Gola bhat Nagpuracha by Pranali Deshmukh at BetterButter
3
5
5(2)
0

Gola bhat Nagpuracha

Feb-24-2018
Pranali Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Gola bhat Nagpuracha कृती बद्दल

नागपूर म्हटलं कि लगेच डोळ्यापुढे येतात एक म्हणजे संत्री आणि दुसरा गोळाभात .काही पदार्थ त्या गावाची ओळख बनून जातात .गोळाभात अतिशय साजूक रेसिपी आहे .चवीला इतका छान कि एकदा खाणारा चव कधीच विसरणार नाही.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी तुरीची डाळ
  2. एक वाटी बासमती तांदूळ
  3. 2 tbsp tel तेल￰
  4. तिखट 1 tbsp
  5. हळद 1 tbsp
  6. मीठ
  7. हिंग चिमूटभर
  8. लसूण जिरे पेस्ट 1 tbsp
  9. गरम पाणी 4-5 चमचे
  10. कोथिंबीर बारीक चिरून 2 चमचे

सूचना

  1. डाळ मिक्सरमधून रवाळ फिरवून घ्या.
  2. एका बाऊलमध्ये डाळीचा भरड ,तिखट ,मीठ,हळद ,लसूण जिरे पेस्ट ,कोथिंबीर ,तेल ,हिंग एकत्र करा.
  3. गरम पाणी घालून घट्ट भिजवा .पाणीहळूहळू घाला .पातळ व्हायला नको. भरड घट्ट मळून घ्या.
  4. एक चमचा तेल टाकून मोहरी , जिरे ,हळद , चिमूटभर तिखट घाला. तांदूळ परतवा आणि लगेच पाणी घाला . भात मोकळा व्हायला हवा म्हणून पाणी घालताना . नेहमी घालतो त्यापेक्षा कमी घाला .झाकण ठेवून भात 50% शिजवायचा आहे.
  5. भिजलेल्या पिठाचे गोळे बनवा.
  6. सर्व गोळे बनवून झाले.
  7. भातावर एक एक गोळा ठेवत सर्व गोळे वर ठेवा. झाकण ठेवून सिम वर शिजू द्या .हवेअसल्यास थोडा पाण्याचा भपका मारा.
  8. झाकण ठेवून 10 मिनिट शिजू द्या. शिजल्यावर गरम गरम गोळाभात मस्त मिरचीच्या तेलासोबत सर्व्ह करा.
  9. चवीला अप्रतिम लागणारा हा पदार्थ एकदा नक्की करून बघा.मिरची आणि गोळा भातात कुस्करून खातात.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mamta Joshi
Mar-03-2018
Mamta Joshi   Mar-03-2018

मस्तच :)

Poonam Nikam
Feb-24-2018
Poonam Nikam   Feb-24-2018

wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर