मुख्यपृष्ठ / पाककृती / भाजीतली फळ

Photo of Bhajitli Fal by pranali deshmukh at BetterButter
571
4
0.0(0)
0

भाजीतली फळ

Feb-24-2018
pranali deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाजीतली फळ कृती बद्दल

नाव वाचून गोंधळात ना ! भाजी आणि त्यामध्ये फळ हा काय प्रकार .....तर सांगते गव्हाच्या पिठापासून फळ बनवतात आणि ती भाजीत टाकतात .भाजीचा फ्लेवर त्या फळाला येतो .तुमचे ते आताचे टॅकोज कि टाकोज हे जरा तसच दिसत....

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप कणिक
  2. चापट वाल किंवा गवार शेंगा 1 पाव
  3. अद्रक लसूण पेस्ट 2 tbsp
  4. कांदा बारीक चिरून
  5. तेल 3 डाव
  6. तिखट 2 tbsp
  7. हळद 1 tbsp
  8. मीठ
  9. गरम मसाला 1 ybdp
  10. मोहरी 1/2 tbsp
  11. हिंग चिमूटभर

सूचना

  1. शेंगा धुवून घ्या शेंगांची वाक काढून शेंगा तोडून घ्या.
  2. कढईत तेल ,मोहरी ,हिंग कांदा घालून परतवा .अद्रक लसूण पेस्ट घाला .तिखट,हळद मीठ घालून शेंगा टाका मिक्स करून एक ग्लास पाणी टाका .थोडं झाकण ठेवून शिजू द्या.
  3. तोपर्यंत कणिकेत मीठ थोडं ,तेल ,ओवा घालून मळून घ्या.थोडा वेळ झाकून ठेवा .मगछान चुरून एक छोटा गोळा घ्या बोटाच्या साह्याने वाटीसारखा आकार द्या मधात खोलगट व्हायला हवी .काठाकाठाने फिरवत सर्व फळे बनवा.
  4. हि फळे अशी भाजीवर ठेवा ..झाकण ठेवा थोड्यावेळानी आपोआप रस्सा वर येईल.
  5. भाजी 50% शिजली कि हे फळे भाजीत टाका .पाणी आटले असेल तर परत.थोडं पाणी टाका .झाकण ठेवून 10 मिनिट शिजू द्या .दहा मिनिटांनी फळे भाजीत मिक्स करा आणि परत 10 मिनिट शिजू द्या.
  6. पाणी पूर्ण आटायला हवं . पाणी आटलं की छान कि फळामध्ये भाजीचा अर्क उतरतो .लोणच्यासोबत सर्व्ह करा.
  7. तुम्ही ह्याच प्रकारे गवाराच्या शेंगणमध्येही फळं टाकु शकता...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर