बेसन वडी | Besan vadi Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  24th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Besan vadi by Pranali Deshmukh at BetterButter
बेसन वडीby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

0

3 votes
बेसन वडी recipe

बेसन वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Besan vadi Recipe in Marathi )

 • 1 वाटी बेसन चणा पिठ
 • 1 वाटी आंबट दही
 • दोन हिरव्या मिरच्या
 • दोन कांदे
 • हिंग
 • मोहरी 1/2 tbsp
 • तिखट 2 tbsp
 • हळद 1 tbsp
 • मीठ
 • तेल 2 डाव
 • कोथिंबीर बारीक चिरलेली 1/4 कप

बेसन वडी | How to make Besan vadi Recipe in Marathi

 1. प्रथम बेसन आणि दही एकत्र करून घ्या .छान मिक्स करा .
 2. त्यामध्ये तिखट ,हळद मीठ टाका.थोडं पाणी घाला पातळ व्हायला नको .
 3. कढईत तेल टाका मोहरी ,हिंग ,कांदा गुलाबी होईपर्यंत परतवा . मिरच्या टाका थोडं अरत परत करा आणि मिक्स केलेलं दही बेसन फोडणीत टाका.मिक्स करा कोथिंबीर घाला आणि झाकण ठेवून 10 - 15 मिनिट शिजू द्या .
 4. एका प्लेटला तेलाने ग्रीसिंग करा .शिजलेला बेसनाचा गोळा प्लेटमध्ये अंथरा.एका सपाट प्लेटने समांतर करा .
 5. धारदार सुरीने वड्या पाडा.
 6. भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा .एकदा ट्राय करून बघा .दोनघास नक्की जास्त जातील.

Reviews for Besan vadi Recipe in Marathi (0)