मुख्यपृष्ठ / पाककृती / मुंग डाल के कोफ्ते

Photo of Moong Dal ke Kofte by Archana Lokhande at BetterButter
890
8
0.0(0)
0

मुंग डाल के कोफ्ते

Feb-25-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुंग डाल के कोफ्ते कृती बद्दल

ही भोजपुरची पारंपरिक रेसिपी आहे.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • बिहार
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी हिरवे मुग (४-५ तास भिजवलेले)
  2. १ वाटी बेसन
  3. ३ चमचा जिरे पूड-धनेपुड-काळीमिर्च पावडर एकत्र केलेले
  4. १ चमचा लाल तिखट
  5. १ चमचा हळद
  6. मीठ
  7. तेल
  8. २-३ चमचा सरसो आणि लसूण पेस्ट
  9. २ टोमॅटो ची पेस्ट
  10. पंचफोरन(पिवळे व काळी मोहरी, बडीशेप, जिरे आणि मेथी दाणे)
  11. कोथिंबिर
  12. पाणी

सूचना

  1. भिजलेली मुग वाटून घ्यावी.
  2. एका बाऊलमध्ये वाटलेली मुग,बेसन,१ चमचा मिक्स मसाला,१/२ चमचा हळद,१/२ चमचा तिखट आणि मीठ घालून मिक्स करून घ्यावे.(पाणी घालू नये.)
  3. कढईत तेल गरम करून कोफ्ते सोडावे.
  4. दोन्ही बाजूंनी छान तळून कोफ्ते बाजूला काढून ठेवावे.
  5. कढईतील जास्तीचे तेल काढून घ्यावे.
  6. नंतर कढईत पंचफोरन घालून तडतडल्यावर २-३ चमचे सरसो-लसूण पेस्ट घालून २चमचे मिक्स मसाला,१/२ चमचा तिखट,हळद आणि मीठ घालून मिक्स करून दोन चमचे पाणी घालून एक उकळी आणून मिश्रण थोडे शिजवून घ्यावे.
  7. नंतर टोमॅटो पेस्ट घालून परतून थोडे पाणी घालून उकळी आल्यावर त्यात कोफ्ते घालून मिक्स करून एक उकळी आल्यावर गँस बंद करावा.
  8. ५-६ मिनिटे कोफ्ते तसेच राहू द्यावेत. नंतर सर्व्हिग बाऊलमध्ये काढून वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर