मुख्यपृष्ठ / पाककृती / मासवडी आणि वडीचा रस्सा

Photo of Maasvadi ani vadicha rasaa by Radhika Hankare at BetterButter
0
11
0(0)
0

मासवडी आणि वडीचा रस्सा

Feb-25-2018
Radhika Hankare
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मासवडी आणि वडीचा रस्सा कृती बद्दल

ही पारंपरिक पाककृती आहे जी खास प्रसंगी किव्वा पाहुणचार साठी केली जाते

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • सिमरिंग
 • बॉइलिंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. सारणासाठी साहित्य
 2. सुके खोबरे भाजून 1 वाटी
 3. भाजलेले तीळ 3 चमचे,
 4. खसखस 1 चमचा
 5. कांदा लसूण मसाला,
 6. कारळे 2 चमचे
 7. मीठ
 8. कोथिंबीर
 9. कढिपत्ता
 10. हिंग
 11. लसूण
 12. लाल मिरची पावडर 1चमचा
 13. गरम मसाला अर्धा चमचा
 14. वडीचे पीठ बनवण्यासाठी साहित्य
 15. बेसन पीठ दीड वाटी
 16. पाणी दीड ते पावणे दोन वाटी
 17. मीठ
 18. हिंग
 19. हळद
 20. कांदा लसूण मसाला
 21. सजावटी साठी
 22. खिसलेले खोबरे
 23. कोथिंबीर
 24. तीळ
 25. रस्सा बनवण्यासाठी साहित्य
 26. अर्धा वाटी भाजलेले खोबरे
 27. लसूण 7ते8 पाकळ्या
 28. आलं आवडीनुसार
 29. जिरे
 30. मोहरी
 31. हिंग
 32. मीठ
 33. कांदा लसूण मसाला
 34. पाणी
 35. कढीपत्ता
 36. खसखस अर्धा चमचा
 37. टोमॅटो 1
 38. शेंडण्याचा कूट 2 चमचे
 39. तेल

सूचना

 1. वडी
 2. सारणासाठी चे सगळे आवडीनुसार प्रमाण घेऊन एकत्र करावे
 3. वडी साठी पीठ तयार करण्यासाठी भांड्यात पाणी उकळत ठेवावे
 4. त्यात चवीनुसार मीठ हळद हिंग तिखट घालावे
 5. उकळलेल्या पाण्यात थोडे खाडे बेसन पीठ सोडत हलवत राहावे
 6. गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यावी
 7. झाकण ठेवून 10 मिनटं वाफ येऊ द्या
 8. पीठ चांगले शिजवून घ्या
 9. आता कॉटन चे स्वच्छ कापड ओले करून पोळपाट अगर ताट उलटे करून त्यावर पसरा
 10. कपड्यावर आधी थोडे खोबरं कोथिंबीर पसरा
 11. त्यावर पीठ घेऊन पीठ एकसारख पात्तळ थापून घ्या
 12. त्यावर कांदा लसूण मसाला आणि तेल मीठ मिक्स करून पसरा
 13. आता पिठाच्या सेन्टर वर सारण एका रेषेत उभट आकारात पसरा
 14. वडिला त्रिकोणी आकार येईल असा फोल्ड द्या
 15. त्रिकोणी आकारात वड्या कापा
 16. खोबरं कोथिंबीर तीळ टाकून सजवा
 17. रस्सा-
 18. आलं लसूण खोबरं जिरे कोथिंबीर चे वाटण करून घ्या
 19. भांड्यात तेल गरम झाले की जिरे मोहरी हिंग कढी पत्ता घाला
 20. खोबऱ्याचे वाटण घालून तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या
 21. कांदा लसूण मसाला घाला
 22. बारीक चिरलेला टोमॅटो घाला
 23. पाणी कूट मीठ कोथिंबीर घालुन उकळी आणा
 24. घट्टपणा साठी वडीचे बारीक तुकडे घाला
 25. गरम भाकरी बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर