मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारी पिठाचा उपमा

Photo of Jowar flour upma by Swati Kolhe at BetterButter
1744
6
0.0(0)
0

ज्वारी पिठाचा उपमा

Feb-27-2018
Swati Kolhe
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारी पिठाचा उपमा कृती बद्दल

ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ज्वारीचे पीठ १ कप
  2. दही १ कप
  3. हिरव्या मिरचीची पेस्ट १tsp
  4. अर्द्रक पेस्ट १/२ tsp
  5. मोहरी १ tsp
  6. हिंग १/४ tsp
  7. कडीपत्ता ५-६
  8. बारीक चिरलेला कांदा १/४ कप
  9. लिंबाचा रस १ tbsp
  10. रवा २-३ tbsp
  11. मीठ चवीनुसार
  12. कोथिंबीर

सूचना

  1. लोखंडी कढई मध्ये तेल गरम करून घ्यावे.
  2. तेलात मोहरी, हिंग, कडीपत्ता, हिरवी मिरची अद्रक पेस्ट घालून १/२ मिनिट परतून घ्यावे.
  3. मग कांदा व हळद घालून, कांदा गुलाबी परतून घ्यावा.
  4. नंतर त्यात रवा, आणि ज्वारीचे पीठ घालून ६-८ मिनिट खमंग भाजून घ्या.
  5. मग दही घालून चांगले मिक्स करून घ्या.
  6. आवश्यकतेनुसार पाणी घालून १ दणदणीत वाफ काढून घ्यावी.
  7. एका प्लेट मध्ये वरील उपमा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घसळून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर