मुख्यपृष्ठ / पाककृती / डिंकाचे पौष्टिक लाडू

Photo of Dink Ladoo by Shraddha Juwatkar at BetterButter
748
7
0.0(0)
0

डिंकाचे पौष्टिक लाडू

Feb-27-2018
Shraddha Juwatkar
40 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डिंकाचे पौष्टिक लाडू कृती बद्दल

डिंकाचे लाडू हिवाळ्यात बनवले जातात. खूपच पौष्टिक आहेत.

रेसपी टैग

  • मध्यम
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. २०० ग्राम डिंक
  2. तूप - साधारण १/२ किलो
  3. १ कप मूगाचे पिठ
  4. १ कप सोयाबिन पिठ
  5. ३/४ कप भरडसर वाटलेले बदाम ३/४ कप भरडसर वाटलेले काजू ३/४ कप भरडसर वाटलेले पिस्ता
  6. १ कप खारीक पावडर
  7. १ कप सुके खोबरे व 1/2 कप खसखस
  8. 1/2 कप हलीम (अळीव)
  9. 3/4 किलो किसलेला गूळ

सूचना

  1. एका कढईत 1/4 तूप गरम करावे व त्यात थोडा थोडा डिंक घालून तळून घ्यावा
  2. उरलेल्या तुपात मुगाचे पीठ खमंग भाजून घ्यावे
  3. पुन्हा थोडे तूप घालून सोयाबीन पीठही खमंग भाजून घ्यावे.
  4. त्याच कढईत सुके खोबरे थोडेसे परतून घ्यावे व एका ताटात काढावे
  5. खारीक पावडर पण थोडी परतून घ्यावी
  6. त्याच कढईत अळीव व खसखस चांगले भाजून घ्यावे व बाजूला काढावे
  7. आता कढईत काजू बदाम पिस्ते घालून थोडे गरम करावे
  8. अळीव, खसखस व काजू बदाम पिस्ते मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावे
  9. भाजलेले सुके खोबरे हाताने चुरून घ्यावे
  10. हे सर्व मिश्रण एकत्रित करावे. फुललेले डिंक हाताने चुरून मिक्स करून घेणे.
  11. त्याच कढईत उरलेले तूप घालून किसलेला गूळ घालून वितळावा. पाक करू नये.
  12. गूळ वितळला की गॅस बंद करावा. गूळ वरील जिन्नसात घालून चमच्याने ढवळून घ्यावे
  13. मिश्रण कोमट असतानाच लाडू वळावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर