Photo of Vegetable upma by kanchan date at BetterButter
1228
3
0.0(1)
0

Vegetable upma

Feb-27-2018
kanchan date
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 मोठी वाटी जाडा रवा
  2. पाव वाटी उभे तुकडे केलेलं गाजर
  3. पाव वाटी हिरवे वाटणे
  4. 1 टोमॅटो चिरलेला
  5. 2 कांदे भरीक कापलेले
  6. 1 चमचा प्रत्येकी मोहरी, जिर, उडीद डाळ, चणा डाळ
  7. 3 ते 4 हिरव्या मिरच्या
  8. 7-8 कडीपत्याची पाने
  9. 2 चमचे साखर
  10. 1 मोठा चमचा तूप
  11. चवी नुसार मीठ
  12. 4 चमचे तेल
  13. कोथिंबीर
  14. आणि अडीच वाटी गरम पाणी

सूचना

  1. कढईमध्ये रवा घेऊन मंद आचेवर छान भाजून घ्या
  2. भाजलेला रवा काढून घ्या आणि त्याच कढईत तेल घाला
  3. तेल गरम झालं कि त्यात मोहरी, जीरा, उडीद डाळ, चना डाळ घालून छान पटून घ्या
  4. आता त्यात कढीपत्ता आणि मिरच्या खालून परतून घ्या
  5. आता कांदा, गाजर आणि वाटणे घालून परतून घ्या आणि 2 ते 3 मिनिट झाकण ठेऊन भाज्या शिजवून घ्या. नंतर त्यात टोमॅटो खालून अर्धा मिनिट पुन्हा शिजवून घ्या.
  6. आता भाजलेला रवा घालून परतून घ्या
  7. आता त्यात थोड थोडं गरम पाणी घाला आणि सारख ढवळत राहा म्हणजे गुठळ्या नाही होणार
  8. मीठ आणि साखर घालून मिक्स करा व 1 मिनिट झाकण ठेऊन वाफ काढून घ्या
  9. झाकण काढून घ्या आणि वरून तूप आणि कोथिंबीर घालून गरम गरम सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kanak Patel
Feb-28-2018
Kanak Patel   Feb-28-2018

Nice!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर