मुस्लीम मटण करी | Muslim Mutton Curry Recipe in Marathi

प्रेषक Disha Khurana  |  13th Mar 2016  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Photo of Muslim Mutton Curry by Disha Khurana at BetterButter
मुस्लीम मटण करीby Disha Khurana
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  90

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2628

2

Video for key ingredients

  मुस्लीम मटण करी

  मुस्लीम मटण करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Muslim Mutton Curry Recipe in Marathi )

  • हाडांसह 750 ग्रॅम्स मटण
  • 400 ग्रॅम्स दही
  • 200 ग्रॅम्स टोमॅटो
  • 200 ग्रॅम्स कांदे
  • 3 हिरव्या मिरच्या
  • 2 मोठे चमचे आले-लसणाची पेस्ट
  • 2 लिंबू
  • 1.5 ते 2 मोठे चमचे काश्मिरी लाल तिखट
  • दीड मोठा चमचे गरम मसाला
  • 1 लहान चमचा हळद
  • 5 ते 6 काळी मिरी
  • 1 ते 2 तमालपत्र
  • 3-4 वेलदोडे
  • 1 इंच दालचिनी
  • 3-4 लवंगा
  • 5 ते 6 मोठे चमचे तूप
  • स्वादानुसार मीठ
  • मोठी मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मुठभर पुदिनाची पाने

  मुस्लीम मटण करी | How to make Muslim Mutton Curry Recipe in Marathi

  1. मटण चांगल्या रीतीने धुवा आणि सर्व अतिरिक्त पाणी गाळून घ्या आणि मसाले लावण्यासाठी तयार ठेवा.
  2. कांदा बारीक चिरून घ्या, त्याला मीठ लावा आणि 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवा. 10 मिनिटानंतर, त्यातील अतिरिक्त पाणी पिळून काढा आणि बदामी रंगाचे होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्या. त्याला अवशोषक कागदावर काढून घ्या आणि बाजूला ठेवा
  3. टोमॅटोचे लहान तुकडे करा; दोन लिंबांचा रस काढून घ्या आणि बाजूला ठेवा
  4. गाठी निघून जातील अशा प्रकारे दही फेटून घ्या आणि त्यात मिरची पूड, गरम मसाला पूड आणि मीठ घाला. त्यात चिरलेला टोमॅटो, आले-लसणाची पेस्ट, लिंबाचा रस आणि बारीक चिरून तळलेला कांदा घाला.
  5. त्यात मटणाचे तुकडे घाला आणि हातांनी किंवा एका कलथ्याने एकजीव करा. त्याला मेरीनेशन होण्यासाठी किंवा मसाले मटणात व्यवस्थित मिसळण्यासाठी फ्रीजमध्ये रात्रभर ठेवून द्या.
  6. सकाळी, ते मटण फ्रीजमधून काढा आणि त्याला सामान्य तापमानावर येऊ द्या.
  7. जाड तळ असलेल्या तव्यात मध्यम ज्वालेवर तूप गरम करा आणि त्यात तमालपत्र, काळी मिरी, दालचिनी, लवंग आणि वेलदोडे घाला आणि एका मिनिटासाठी त्याला तडतडू द्या. तव्यातील मसाल्यासोबत मसाला लावलेले मटण त्यात घाला आणि एक उकळी येऊ द्या.
  8. एक उकळी आल्यानंतर, त्याला कमी ज्वालेवर सुमारे 1 ते 1.5 तासांसाठी मंदपणे उकळू द्या आणि मटण मऊ आणि हाडे निघेपर्यंत त्याला अधूनमधून हलवीत रहा.
  9. मसाला आणि मटण व्यवस्थित शिजल्याची आणि मटण मऊ झाल्याची खात्री करा; चिरलेली कोथिंबीर आणि पुदिनाच्या पानांनी त्याला सजवा.
  10. खाबू किंवा मऊ लोणी पावासह किंवा भात आणि कांद्याच्या कोशिंबिरीबरोबर गरमागरम वाढा.

  My Tip:

  या प्रक्रियेसाठी घाई करू नका, या डिशला जेवढे हळू शिजवू तेवढेच ते स्वादिष्ट होते; त्याचा पोत सुरेख होतो; आणि त्याचे स्वरूप आकर्षक होते.

  Reviews for Muslim Mutton Curry Recipe in Marathi (2)

  Jyotsna Chaudharia year ago

  Khup chhan
  Reply

  Naresh Dasaria year ago

  Reply

  Cooked it ? Share your Photo