राईस इडली | Rice Idli Recipe in Marathi

प्रेषक Archana Lokhande  |  1st Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Rice Idli by Archana Lokhande at BetterButter
राईस इडलीby Archana Lokhande
 • तयारी साठी वेळ

  9

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

राईस इडली recipe

राईस इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rice Idli Recipe in Marathi )

 • १ १/२ वाटी तांदूळ
 • १/२ वाटी उडीद डाळ
 • १ चमचा मेथी दाणे
 • २ मोठे चमचे भात
 • मीठ
 • पाणी

राईस इडली | How to make Rice Idli Recipe in Marathi

 1. तांदूळ, डाळ आणि मेथी दाणे सर्व स्वच्छ एक-दोन पाण्याने धुवून रात्रभर वेगवेगळे भिजत ठेवले.
 2. दुसऱ्या दिवशी सकाळी वाटून घ्या.प्रथम मिक्सरवर थोडे पाणी घालून मेथी दाणे वाटून घ्यावे आणि अँलुमिनीयमच्या भांड्यात काढून ठेवावे.
 3. डाळीतील जास्तीचे पाणी काढून घ्यावे आणि लागेल तसे पाणी घालून वाटून घ्यावे. (वाटताना पाण्याचा वापर कमी करावा हे सर्व मिश्रण थोडे घट्ट असले पाहिजे.
 4. नंतर भातात पाणी घालून वाटला व बाजूला काढला आणि नंतर भिजवलेले तांदूळ ही पाणी घालून वाटून घेतला.
 5. सर्व छान मिक्स करून हे मिश्रण आंबवण्यासाठी ८-९ तास उबदार जागी झाकून ठेवले.
 6. ८-९ तासांनी मिश्रण छान फुगून वर येते तेव्हा चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करावे.
 7. इडलीच्या भांड्यात पाणी घालून उकळण्यास गँसवर ठेवा.
 8. पाणी उकळेपर्यंत इडलीच्या साच्याला तेल लावा आणि तयार पीठ हालवून चमच्याने साचा पूर्ण भरा.
 9. पाणी उकळल्यास त्यात इडलीचा साचा ठेवा आणि १० मिनिटे वाफेवर इडल्या होऊ द्या.
 10. नंतर गँस बंद करून ५ मिनिटांनी इडल्या काढा.
 11. गरमागरम इडली सांबार आणि नारळाच्या चटणी सोबत सर्व करा.

Reviews for Rice Idli Recipe in Marathi (0)