कांद्याची चटणी | Onion Chutney Recipe in Marathi

प्रेषक Pavithira Vijay  |  14th Mar 2016  |  
5 from 1 review Rate It!
 • Onion Chutney recipe in Marathi,कांद्याची चटणी , Pavithira Vijay
कांद्याची चटणी by Pavithira Vijay
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1518

1

कांद्याची चटणी recipe

कांद्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Onion Chutney Recipe in Marathi )

 • 2 मध्यम कांदे
 • 1 मोठा चमचा तेल
 • 3 लसणाच्या पाकळ्या
 • 3 सुकलेल्या लाल मिरच्या
 • 2 मोठे चमचे उडीदडाळ
 • 1 लहान चमचा चणाडाळ
 • मीठ आवश्यकतेनुसार
 • चिंच (आवळ्या इतकी)
 • फोडणीसाठी:
 • 1 मोठा चमचा तेल
 • अर्धा लहान चमचा मोहरी
 • अर्धा लहान चमचा जिरे
 • 1 लहान चमचा उडीदडाळ (ऐच्छिक)
 • एक चिमूटभर हिंग
 • 2 सुकलेल्या लाल मिरच्या
 • 1 कडीपत्त्याची पाने असलेली लहान काडी

कांद्याची चटणी | How to make Onion Chutney Recipe in Marathi

 1. एका कढईत तेल गरम करा आणि त्यात उडीदडाळ आणि चणाडाळ बदामी रंगाचे होईपर्यंत तळा. नंतर त्यात सुकलेल्या लाल मिरच्या आणि लसूण घाला आणि सर्व एकत्र तळा.
 2. नंतर त्यात चिरलेला कांदा घाला, आणि तो मऊ आणि पारदर्शक होईपर्यंत परता. गॅस बंद करा आणि त्याला थंड होऊ द्या.
 3. त्याला वाटण्यासाठी थोडे पाणी घाला. त्यात मीठ आणि चिंच मिसळा आणि सर्व एकत्र वाटा आणि चटणीसारखे जाडसर ठेवा.
 4. फोडणीसाठी, तेल गरम करा. त्यात उडीदडाळ, मोहरी नंतर जिरे, हिंग आणि सुकलेल्या लाल मिरच्या घाला. या फोडणीला चटणीवर घाला आणि मिसळा.

My Tip:

तुम्ही यात आल्याचा एक तुकडा देखील टाकू शकता. फोडणी पूर्णपणे आवडीनुसार असेल, कारण अगोदरच सर्व घटक तेलावर परतून घेतलेले आहेत. परंतु, फोडणीमुळे एक चागला सुगंध मिळतो, खास करून जेव्हा तुम्ही त्यात कडीपत्ता घालता. तुमच्या जेवढे तिखट पाहिजे त्यानुसार मिरच्या घालू शकता.

Reviews for Onion Chutney Recipe in Marathi (1)

vrushali pathare9 months ago

Reply

Cooked it ? Share your Photo