BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / सोयाबीनची वाटली डाळ

Photo of Soyabean chi Vatali Dal by Anuradha Kuvalekar at BetterButter
0
5
0(0)
0

सोयाबीनची वाटली डाळ

Mar-03-2018
Anuradha Kuvalekar
480 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोयाबीनची वाटली डाळ कृती बद्दल

सोयाबीन एक प्रोटीनयुक्त घटक आहे. सोयाबीनच्या नियमित वापराने हाडं मजबूत होतात तसेच हृद्याच्या आजारावर , उच्च रक्तदाबावर, पोटांचे विकारांवर उपयोगी आहे असे माझ्या वाचनात आले आहे. आज मी सोयाबीनचे भिजवलेले दाणे वापरून सोयाबीनची वाटली डाळ केली आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • महाराष्ट्र
 • सिमरिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. १ वाटी सोयाबीनचे दाणे 
 2. १ मध्यम बारीक चिरलेला कांदा 
 3. २-३ हिरव्या मिरच्यांचें तुकडे 
 4. ५-६ कढीपत्याची पानें 
 5. १/२ चमचा साखर 
 6. १/२ लिंबाचा रस
 7. मीठ चवीनुसार 
 8. फोडणीकरिता:
 9. ३-४ टे.स्पुन तेल 
 10. थोडासा हिंग
 11. १/४ चमचा लाल तिखट 
 12. १/४ चमचा मोहरी
 13. सजावटीकरिता :
 14. खोवलेला नारळ  व बारीक चिरलेली कोथिंबीर 

सूचना

 1. १ वाटी सोयाबीनचे दाणे रात्रभर भिजवा. सकाळी पाणी काढुन मिक्सरवर बारीक वाटा. 
 2. एका कढईत ३-४ टे.स्पुन तेल तापवा. त्यात १/४ चमचा मोहरी, १/४ चमचा हळद, १/४ चमचा लाल तिखट, थोडासा हिंग, हिरव्या मिरच्यांचें तुकडे व कढीपत्याची पाने घालुन फोडणी करा. बारीक चिरलेला कांदा गुलाबीसर होईपर्यंत परता. 
 3. त्यात सोयाबीनचे वाटलेले दाणे घालुन परता.  १/२ लिंबाचा रस, १/२ चमचा साखर, चवीनुसार मीठ घालुन  झाकण ठेवुन एक वाफ द्या. (२-३ मिनिटे)
 4. सोयाबीन शिजले पाहिजे. झाकण काढुन २-३ मिनिटे परता. 
 5. गरम-गरम  सोयाबीनची वाटली डाळ डिशमध्ये ओला नारळ व कोथिंबीर घालुन सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर