मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स दाल पालक

Photo of mix dal with spinach by साची सचिन at BetterButter
828
5
0.0(0)
0

मिक्स दाल पालक

Mar-03-2018
साची सचिन
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स दाल पालक कृती बद्दल

या मधे मिक्स डाळी आहेत आणि पालक...त्यामुळे या रेसिपी मधे खुप सार प्रोटीन आणि पालक मधे फायबर आहे.म्हणून ही रेसिपी स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/२ वाटी तुर डाळ
  2. १/४ वाटी मुग डाळ
  3. १/४ वाटी मसूर डाळ
  4. १ वाटी पालक
  5. १ छोटा कांदा बारीक़ चिरलेला
  6. १ मोठा टोम्याटोचि प्यूरी
  7. आल लसून हिरवी मीरचीचा ठेचा
  8. १ चमचा तिखट
  9. १/२ चमचा हळद
  10. १/२ चमचा गरम मसाला
  11. राई जीर हींग फोड़नीसाठी
  12. २ चमचे ओल खोबर
  13. २ चमचे तेल
  14. चविनुसार मिठ

सूचना

  1. सर्व डाळी धुवून कुकर मधून ४ शिटया काढून घ्याव्यात
  2. आता एका कढईत २ चमचे तेल घेऊन तापले की त्यात राई जीर आणि हींग फोड़नीला घाला
  3. आता त्यात आल लसुन मिरचिची भरड घाला आणि चांगली परतून घ्या
  4. मग त्यात कांदा घालुन गुलाबी रंगावर परता
  5. आता त्यात टोमॅटो ची प्यूरी घालुन ३ ते ४ मिनिट चांगले परतून घ्या
  6. मग त्यात हळद आणि तिखट घालुन परता
  7. आता त्यात बारीक चिरलेला पालक घालुन ३ ते ४ मिनिट परता.(पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही)
  8. मग त्यात शिवलेली डाळ घालुन चांगले मिक्स करा
  9. मग डाळ जेवढी पातळ हवि असेल तेवढेच पाणी घालुन गरम मसाला आणि मिठ घाला आणि मिक्स करुन एक उकळी येऊ दया
  10. आता वरुन ओल खोबर घालुन मिक्स करा. तयार आहे मिक्स दाल पालक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर