Photo of Beetroot Idli by Dr.Shubhangi Kumbhar at BetterButter
1270
6
0.0(1)
0

Beetroot Idli

Mar-04-2018
Dr.Shubhangi Kumbhar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बीटरुट, १/२ कप (किसलेले)
  2. रवा १/२ कप
  3. ब्रेड क्रम्स १/२ कप
  4. दही १/२ कप
  5. हिरव्या मिरच्या ३, बारीक चिरलेल्या
  6. कोथिंबीर १/४, चिरलेली
  7. जिरे १ चमचा, लहान
  8. मोहरी १ चमचा, लहान
  9. बेकिंग सोडा १/४ चमचा, लहान
  10. मीठ १ चमचा, लहान
  11. तेल १ चमचा, मोठा

सूचना

  1. एका भांड्यात रवा, दही, ब्रेड क्रम्स, बीट किसलेले, मीठ, आणि कोथिंबीर घालून इडली बॅटर सारखे मिक्स करून घ्यावे.
  2. तयार केलेले इडली बॅटर १५ मिनिटांसाठी सेट होण्यासाठी झाकुन ठेवावे
  3. एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरी, हिरव्या मिरची घालून फोडणी करावी आणि ही फोडणी तयार केलेल्या इडली बॅटर मध्ये घालून मिक्स करून घ्यावे.
  4. इडली बॅटर इडली मोल्ड मध्ये किंवा इडली पॅनमध्ये घालण्यापूर्वी बेकिंग सोडा घालून मिक्स करावे.
  5. इडली मोल्डला तेल लावून घ्यावे आणि साधारण दोन ते तीन चमचे बॅटर घालुन पॅन तयार करणे.
  6. इडली कुकर मध्ये १ ग्लास पाणी घालून त्यामध्ये इडली स्टॅड ठेवून मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे ठेवणे.
  7. तयार झालेली बीटरुट इडली खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करावी.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Maanika Hoon
Mar-06-2018
Maanika Hoon   Mar-06-2018

Lovely colour on these

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर