BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक - कॉर्न राईस

Photo of Spinach - Corn Rice by Sanika SN at BetterButter
0
4
0(0)
0

पालक - कॉर्न राईस

Mar-04-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक - कॉर्न राईस कृती बद्दल

पालकाचे गुणधर्म असलेली साधी पण चविष्ट पाककृती

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. १ वाटी तांदूळ, स्वच्छ धुवून, ३० मिनिटे भिजत ठेवणे
 2. दीड वाट्या पालकाची प्युरी
 3. १/४ वाटी स्वीटकॉर्न
 4. २ टेबलस्पून्स आले + लसूण + हिरव्या मिरचीची पेस्ट
 5. एक कांदा पातळ, उभा चिरलेला
 6. २ मसाला वेलदोडे
 7. ३-४ लवंगा
 8. ३-४ काळिमिरी
 9. १ इंच दालचिनी
 10. १ टीस्पून जीरे
 11. दीड टीस्पून्स गरम-मसाला
 12. मीठ चवीनुसार
 13. तेल / तूप

सूचना

 1. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल किंवा तूप गरम करून त्यात जीरे, मसाला वेलदोडे, हिरवे वेलदोडे, लवंगा, काळिमिरी, दालचिनी घालून परतावे.
 2. त्यातच आले + लसूण + हिरवी मिरची पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परतावे.
 3. आता त्यात कांदा घालून तो सोनेरी रंगावर परतावा.
 4. त्यात पालकाची प्युरी, स्वीटकॉर्न व गरम मसाला घालून शिजवावे.
 5. भिजवलेले तांदूळ निथळून घ्यावे व पातेल्यात घालावे.
 6. चांगले एकत्र करून एक-दोन मिनिटे परतावे.
 7. २-१/४ वाट्या पाणी घालून उकळी येईसोतवर शिजवावे.
 8. उकळी येताच चवीप्रमाणे मीठ घालून , मंद आचेवर झाकून दहा मिनिटे शिजवावे.
 9. भात शिजला की गॅस बंद करून काट्याने फ्ल्फ करन घ्यावे.
 10. हा पालक-कॉर्न राईस मी भाजलेल्या पापडासोबत, लसूणी-जीरा आलू व मसाला दह्यासोबत सर्व्ह केला. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर