मटण वडे | Matan vade Recipe in Marathi

प्रेषक लेखा औसरकर  |  5th Mar 2018  |  
4.7 from 3 reviews Rate It!
 • Photo of Matan vade by लेखा औसरकर at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  90

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

5

3

मटण वडे recipe

मटण वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Matan vade Recipe in Marathi )

 • तांदूळ पीठ 1 वाटी
 • चना डाळ पीठ बेसन 1/2 वाटी
 • गव्हाचे पीठ 1/2 वाटी
 • उडीद डाळ पीठ 1/2
 • उडीद डाळ पीठ नसेल तर उडीद डाळ भिजवून वाटू घेणे त्यात ( जिरे बडीशोप धने व मेथी )घेणे
 • जिरे पावडर 1 चमचा , हळद 1/2 चमचा ,लाल तिखट 1/2 चमचा,मीठ चवी नुसार
 • धने पावडर 1/2 चमचा
 • तळण्यासाठी तेल
 • गरम पाणी

मटण वडे | How to make Matan vade Recipe in Marathi

 1. प्रथम सर्व पीठ एकत्र करून घेणे
 2. त्यात जीरे धने मेथी बडीशोप पावडर टाका
 3. जर उडीद पीठ नसेल तर उडीद डाळ भिजत टाकून ती वाटून घेणे वाटतांना जिरे धने बडीशोप व मेथी दाणे टाकून वाटा व ते पीठ घ्या
 4. त्यात तिखट हळद व चवी नुसार मीठ टाका व सर्व एकत्र करा. गरम पाणी करून ते पीठावर टाका व चमच्याने हालवून ते एक तास झाकून ठेवा
 5. पीठ जरा घट्ट भिजवावे.एक तासाने पीठ मळून घेणे
 6. आता लहान लहान गोळे करुन ते प्लास्टिक पेपर ला तेलाचा हात लावून बोटाने वडा थापून घ्या
 7. तेल गरम करून एक एक वडा छान तळून घ्या
 8. छान गरमागरम वडे तयार

My Tip:

आपणास हवे असेल तर सर्व धान्य भाजून व धने जिरे बडीशोप व मेथी हे भाजून पीठ तयार करु शकतात

Reviews for Matan vade Recipe in Marathi (3)

Maanika Hoon2 years ago

Yummy
Reply
लेखा औसरकर
2 years ago
thanks

ajita moraskar2 years ago

खूप मस्त, नक्की करिन.
Reply
लेखा औसरकर
2 years ago
धन्यवाद

सौ. राजश्री महानाड2 years ago

टेस्टी टेस्टी :ox::ox:
Reply
लेखा औसरकर
2 years ago
धन्यवाद राजजी आपल्या यम्मी इकडे पण आल्या