मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणी व गव्हाचे पौष्टिक कूकीज

Photo of Nachni v Gvhache poushtik cookies by Aarti Nijapkar at BetterButter
884
6
0.0(0)
0

नाचणी व गव्हाचे पौष्टिक कूकीज

Mar-05-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणी व गव्हाचे पौष्टिक कूकीज कृती बद्दल

अतिशय पौष्टिक अश्या ह्या कुकीज आहेत नाचणी चे सत्व हे शरीराला फार उपयुक्त असा घटक आहे आणि गव्हाचे पीठ तर आहेच की अशी ही पाककृती मुलांना आरोग्यासाठी छान अशी शिवाय मोठेमंडळी ना सुध्दा आवडेल अशी ही नाचणी व गव्हाचे पौष्टिक कूकीज

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बेकिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. नाचणीचं पीठ  १ कप   
  2. गव्हाचं पीठ १ कप
  3. पिठी साखर (बारीक वाटलेली साखर )१ कप
  4. थंड बटर किंवा तूप १ कप
  5. बेकिंग पावडर २ लहान चमचे
  6. दालचिनी पावडर १ लहान चमचा
  7. दूध (गरजेनुसार ) ३ मोठे चमचे
  8. किसलेलं बदाम २ मोठे चमचे
  9. बदाम  १५ ते २० कूकीज वर लावायला

सूचना

  1. ओव्हन १८०*c ला गरम करा
  2. एक खोलगट कढई घ्या त्यात नाचणीचे पीठ चांगलं खरपूस भाजून मग एका पसरट ताटात काढून घ्या
  3. त्याच कढईत गव्हाचं पीठ चांगलं खरपूस भाजून दोन्ही एकत्र करुन ५ ते ७ मिनिटे बाजूला ठेवून द्या.
  4. आता एक खोलगट भांड घ्या त्यात एकत्र करुन घेतलेली पीठ घाला, थंड बटर , बेकिंग पावडर , किसलेली बदाम व दालचिनी पावडर हे सर्व व्यवस्थित एकत्र करुन घ्या.
  5. आता पिठी साखर घालून एकजीव करुन घ्या.
  6. मग दूध घालून व्यवस्थित एकजीव करुन  (मळून ) घ्या. मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन लाटून घ्या मग कूकिज कटरने हव्या त्या आकाराचे करुन घ्या.
  7. प्रत्येकी कूकिज वर बदामाचे काप दाबून लावा. ओव्हन च्या ट्रे वर व्यवस्थित ठेवून द्या.
  8. बदामावर मध लावून घ्या
  9. मग गरम ओव्हन मध्ये १२ ते १५ मिनिटे बेक करुन घ्या. बेक झाल्यावर थंड करुन एका हवाबंद  बरणीत भरुन ठेवा
  10. चहा सोबत किंवा मधल्या वेळेस खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर