मुख्यपृष्ठ / पाककृती / जिर्‍या-मिर्‍याचा खाकरा

Photo of Pepper - Cumin Khakra by Sanika SN at BetterButter
369
6
0.0(0)
0

जिर्‍या-मिर्‍याचा खाकरा

Mar-05-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जिर्‍या-मिर्‍याचा खाकरा कृती बद्दल

खाकरा नाममात्र तेलात बनवला आहे. बनविण्यास सोपा, पाैष्टिक व स्वादिष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. १ वाटी कणीक
  2. १ टीस्पून भाजून, भरडसर वाटलेले / कूटलेले जीरे
  3. १ टीस्पून कूटलेली काळीमिरी
  4. मीठ चवीप्रमाणे
  5. १ टीस्पून तेल

सूचना

  1. कणकेत जीरे, मिरी, मीठ व थोडे तेल घालून घट्ट कणीक भिजवून घ्यावी.
  2. झाकून १५-२० मिनिटे ठेवावी.
  3. कणकेचा छोटा गोळा घेऊन जमेल तितके पातळ लाटावे.
  4. मी मिनी खाकरे बनवलेत , एकसारखे दिसावेत म्हणून डब्याच्या झाकणाने कातून घेतले.
  5. तवा मंद आचेवर गरम करायला ठेवावा.
  6. त्यावर कातलेला खाकरा टाकून दोन्हीबाजूने जेमतेम भाजून घ्यावा व लगेज ताटात काढावा.
  7. थोडे तेल ब्रश करावे व १० -१५ मिनिटे बाजूला ठेवावे.
  8. अशा पद्धतीने सर्व खाकरे जेमतेम भाजून घ्यावे व थोडे तेलाने ब्रश करुन बाजूला ठेवावे.
  9. तवा मंद आचेवर गरम करायला ठेवावा.
  10. आता तेल लावलेली पोळी तव्यावर टाकावी व लाकडी साच्याने (वुडन प्रेस) दाबत सर्व बाजूने चांगली भाजून घ्यावी. 
  11. उलटवून पुन्हा सर्व बाजूने भाजावी.
  12. आच मंदच हवी, खाकरा चांगला खुसखुशीत भाजला गेला पाहिजे.
  13. पूर्ण गार झाले की हवाबंद डब्यात भरून ठेवावे.
  14. हे खाकरे तुम्ही लोणचं, तुप, चाट मसाला भुरभुरून किंवा नुसतेच चहाबरोबर सर्व करु शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर