Photo of Adaai by Susmita Tadwalkar at BetterButter
588
7
0.0(0)
0

अडाई

Mar-06-2018
Susmita Tadwalkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अडाई कृती बद्दल

ही कृती दाक्षिणात्य असून डाळी व कडधान्यांपासून बनते, तसेच मेथीसारख्या पालेभाजीचा पण समावेश केला जातो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • तामिळ नाडू
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदुळ २ वाट्या
  2. ऊडिद डाळ, चणा डाळ, मुग डाळ, मसूर डाळ प्रत्येकी १/२ वाटी
  3. हरभरा, मसूर, मूग, मटकी प्रत्येकी १ मूठभर
  4. ३-४ लाल सुख्या मिरच्या
  5. ७-८ कढिपत्त्याची पाने
  6. आलं १ छोटा तुकडा
  7. बारिक चिरलेला कांदा १ मोठा
  8. मेथी धुऊन बारिक चिरून १ वाटी
  9. कोथिम्बीर चिरलेली १/२ वाटी
  10. हिरव्या मिरच्या २-३
  11. मिठ चवीनुसार
  12. तेल किंवा तूप ४-५ चमचे

सूचना

  1. तांदूळ, डाळी, कडधान्ये, लाल मिरच्या धुऊन ५-६ तास भिजत घाला
  2. नंतर त्यातील पाणी काढून घ्या. हेच पाणी वाटताना वापरावे
  3. आता त्यात हिरव्या मिरच्या, आलं, कढिपत्ता घालून मिक्सर मधून‌ निट वाटून घ्या
  4. ह्या मिश्रणात कांदा, मेथी, कोथिम्बीर व‌ मिट घालून निट मिसळून घ्या
  5. थोडं पाणी घालून पातळ करा
  6. तवा गरम करून घ्या व त्यावर हे पिठ पसरून डोश्यासारखं तूप सोडून दोन्ही बाजूंनी भाजून चटणीबरोबर खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर