मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक मुग दलिया डोसा

Photo of Palak Mung Daliya Dosa by Purva Sawant at BetterButter
805
8
0.0(0)
0

पालक मुग दलिया डोसा

Mar-06-2018
Purva Sawant
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक मुग दलिया डोसा कृती बद्दल

न्याहारी, मुलांच्या डब्यासाठी  छानसा आरोग्यदायी पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • कर्नाटक
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सालवाली मुगडाळ- १/४ कप (डाळीऐवजी अख्खे मुग वापरले तरी चालतील पण रात्रभर भिजवावे लागतील.)
  2. दलिया (लापशी रवा)- १/४ कप
  3. बारीक रवा- १ टेबलस्पून
  4. पालक, चिरून- १/४ कप
  5. हिरवी मिरची- २ ते ३
  6. लसुण पाकळ्या- २
  7. जीरे- १/२ टीस्पून
  8. दही- १ टेबलस्पून
  9. हिंग- चिमुटभर
  10. तीळ- १ टीस्पून
  11. मीठ- चवीनुसार
  12. तेल- आवश्यकतेनुसार

सूचना

  1. मुगडाळ व दलिया धुऊन, रात्रभर किंव्हा किमान ४ तास पाण्यात वेगवेगळे भिजत घाला.
  2. हि भिजलेली डाळ, पालकाची पाने, मिरची, लसुण, जीरे, साखर, दही आणि जरुरीनुसार पाणी एकत्र करून  मिक्सरवर वाटा. दलिया सुद्धा वाटून डाळीच्या मिश्रणात मिसळा.
  3. त्या वाटलेल्या मिश्रणात रवा, हिंग, तीळ आणि मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्या. ते मिश्रण १० मिनिटांसाठी तसच ठेवा म्हणजे रवा भिजेल.
  4. डोसा तवा गरम करून थोडेसे तेल पसरवा. त्यावर डोसे करून घ्या. नेहमीच्या डोश्याप्रमाणे  पातळ नको.
  5. सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी भाजून घ्या.
  6. टोमाटो केचप सोबत किंव्हा कुठल्याही आवडीच्या चटणीसोबत गरमागरम वाढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर