मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोनट राईस

Photo of Coconut Rice by Sanika SN at BetterButter
601
6
0.0(0)
0

कोकोनट राईस

Mar-06-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकोनट राईस कृती बद्दल

ओल्या नारळाचा स्वाद असणारा, खमंग राईस. खोबरेल तेलाच्या फोडणीमुळे अधिक रुचकर लागणारी पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • तामिळ नाडू
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी तांदळाचा शिजवलेला भात (शिळा भात असल्यास तो ही चालेल)
  2. १ वाटी खवलेला ओला नारळ
  3. १/२ टीस्पून मोहरी
  4. १ टीस्पून उडदाची डाळ
  5. १ टीस्पून चणाडाळ
  6. १ टेस्पून काजू
  7. २-३ लाल सुक्या मिरच्या तोडून
  8. १ हिरवी मिरची बारीक चिरलेली
  9. कढीपत्ता
  10. १/४ टीस्पून हिंग
  11. मीठ चवीनुसार
  12. २ टेस्पून खायचे खोबरेल तेल

सूचना

  1. पातेल्यात २ टेस्पून खोबरेल तेल गरम करावे.
  2. तुम्ही रोजच्या वापरातले तेल वापरले तरी चालेल पण खोबरेल तेल वापरल्यामुळे भाताचा स्वाद छान लागतो.
  3. त्यात मोहरी, हिंगाची फोडणी करावी.
  4. त्यात उडदाची डाळ, चणाडाळ व काजू घालून तांबूस रंगावर परतून घ्यावे.
  5. त्यात कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या व हिरवी मिरची घालून परतावे.
  6. आता त्यात ओला नारळ व मीठ घालून खोबर्‍याचा रंग न बदलता मंद आचेवर परतावे.
  7. शिजवलेला भात घालून चांगले मिक्स करावे व झाकून मंद आचेवर एक-दोन वाफा काढाव्यात.
  8. दिसायला साधा तरीही स्वादिष्ट असा हा कोकोनट राईस तुम्ही पापड, लोणचं, रस्सम किंवा सांबाराबरोबर सर्व्ह करु शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर