मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधीना ना मुठीया

Photo of Doodhi Muthia by Archana Lokhande at BetterButter
811
5
0.0(0)
0

दुधीना ना मुठीया

Mar-06-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधीना ना मुठीया कृती बद्दल

दुधी मुठीया ही एक गुजरातची पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दुधी १/२ किलो
  2. गव्हाचे पीठ १ १/२ वाटी
  3. बेसन १/२ वाटी
  4. रवा १/२ वाटी
  5. लाल तिखट १ चमचा
  6. हळद १/२ चमचा
  7. धने-जिरे पावडर १ चमचा
  8. मीठ
  9. जिरे
  10. मोहरी
  11. २-३ मिरची+८ लसूण पाकळ्या+आल१"यांची एकत्रित पेस्ट
  12. लिंबू १/२
  13. साखर १ चमचा
  14. सोडा २ चिमूट
  15. कोथिंबिर
  16. कडीपत्ता १०-१२
  17. तीळ २चमचे
  18. हिंग
  19. गरम मसाला १/२ चमचा
  20. तेल ४ चमचे

सूचना

  1. एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, बेसन, रवा,तिखट, धने-जिरे पावडर, हळद,साखर, सोडा, हिंग, गरम मसाला ,मीठ आणि दोन चमचे तेल घालून मिक्स करून घ्या.
  2. दुधी किसून घ्या.
  3. पिठात किसलेला दुधी, मिरची पेस्ट, लिंबू आणि कोथिंबीर घालून सर्व छान मिक्स करून गोळा करून घ्या
  4. गँसवर पातेल्यात दोन ग्लास पाणी गरम करत ठेवा.
  5. चाळणीला तेल लावून घ्या.
  6. तयार पिठाला तेल लावून त्याचा रोल करा आणि चाळणीत ठेवून पातेल्यावर ठेवून १५-२० वाफलून घ्या.
  7. २० मिनीटांनी वडी झाली का हे पाहण्यासाठी चाकूने असे बघा.
  8. चाकू स्वच्छ बाहेर आला म्हणजे वडी झाली.
  9. थोडा वेळ थंड करून अशी कापून तुकडे करून घ्या.
  10. आता कढईत दोन चमचे तेल गरम करून त्यात मोहरी,जिरे आणि कडीपत्ता घालून तडतडल्यावर तीळ घालून मिक्स करून घ्यावे.
  11. नंतर वड्या घालून मिक्स करून दोन मिनिटे परतून घ्यावे.
  12. तयार वडी हवी असल्यास वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर